Police Take Strict Action :श्रीराम नवमीसह आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. वारंवार गुन्हे करणाऱ्या पाच सराईत इसमांना अकोला व बाळापूर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडक कारवाई; सराईत गुन्हेगारांवर तडीपारीचा बडगा
अकोला : श्रीराम नवमीसह आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. वारंवार गुन्हे करणाऱ्या पाच सराईत इसमांना अकोला व बाळापूर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
अकोला पोलीस भरतीची तात्पुरती निवड यादी जाहीर; १६१ पदांसाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित आरोपींच्या विरोधात दाखल गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी, अकोला यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
त्यावर निर्णय देत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी सैयद मोबीन सैयद हसन, अमर महेंद्र उज्जेनवार, महेश ओंकार त्रिपाठी, नितेश महादेव वाकोडे आणि मनीष हरीषकुमार खानचंदानी या पाच जणांना सहा महिन्यांसाठी अकोला व बाळापूर तालुक्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे सणोत्सवाच्या काळात संभाव्य गुन्हेगारीवर अंकुश बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, कायद्याचे पालन न करणाऱ्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरोधात यापुढेही तडीपार, एमपीडीए व इतर कायद्यांन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, “जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहतील,” असा इशाराही अर्चित चांडक यांनी दिला आहे.

