Mahabreaking

[breaking_news]

Ibrahim Sheikh Mansab : चित्रातून बंधुभावाचा संदेश; इब्राहिम शेख-मनसब यांनी साकारली श्रीरामांची आकर्षक कलाकृती  

Ibrahim Sheikh Mansab :  धार्मिक सौहार्द आणि कलात्मक अभिव्यक्तीचा सुंदर मिलाफ घडवत वाडेगाव येथील चित्रकार व वरिष्ठ पत्रकार इब्राहिम शेख-मनसब यांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला प्रभू श्रीरामांचे भावपूर्ण चित्र रेखाटून एक वेगळाच संदेश दिला आहे. त्यांच्या या कलाकृतीचे अकोला जिल्ह्यासह परिसरात सर्वत्र कौतुक होत असून समाजात ऐक्य आणि सद्भावनेची भावना अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Ibrahim Sheikh Mansab

जाकीर अहमद

बाळापूर : धार्मिक सौहार्द आणि कलात्मक अभिव्यक्तीचा सुंदर मिलाफ घडवत वाडेगाव येथील चित्रकार व वरिष्ठ पत्रकार इब्राहिम शेख-मनसब यांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला प्रभू श्रीरामांचे भावपूर्ण चित्र रेखाटून एक वेगळाच संदेश दिला आहे. त्यांच्या या कलाकृतीचे अकोला जिल्ह्यासह परिसरात सर्वत्र कौतुक होत असून समाजात ऐक्य आणि सद्भावनेची भावना अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Ibrahim Sheikh Mansab

अनेक वर्षांपासून चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक विषय हाताळणारे इब्राहिम शेख-मनसब यांनी यंदा रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामांचे शांत, तेजस्वी आणि भक्तिभाव जागवणारे चित्र कॅनव्हासवर साकारले आहे. त्यांच्या कुंचल्यातून उतरलेल्या या चित्रात श्रीरामांचा संयम, तेज आणि मर्यादा पुरुषोत्तमाचा भाव जिवंतपणे उमटलेला दिसतो.

या कलाकृतीमागे समाजात परस्पर आदर, बंधुभाव आणि संस्कृतीप्रती प्रेमाचा संदेश देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “कला ही माणसांना जोडणारी शक्ती आहे. विविध धर्म-संस्कृतींचा सन्मान राखत समाजात ऐक्य निर्माण करणे हे कलाकार म्हणून आपले कर्तव्य आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

रामनवमीच्या पूर्वसंध्येला साकारलेल्या या चित्राचे स्थानिक नागरिक, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष कौतुक होत आहे. एका मुस्लिम कलाकाराने प्रभू श्रीरामांचे भावपूर्ण चित्र रेखाटत दिलेला हा संदेश समाजातील सलोखा आणि बंधुभाव अधिक दृढ करणारा ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top