Mahabreaking

[breaking_news]

Lalarav Deshmukh :सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते लालाराव देशमुख यांचे निधन; पोफळ शिवनीत शोककळा

Lalarav Deshmukh :सहकार चळवळीत सक्रिय भूमिका बजावणारे आणि ग्रामीण राजकारणात ठसा उमटवणारे पोफळ शिवनी येथील माजी सरपंच लालाराव देशमुख यांचे बुधवारी (२५ मार्च) वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Lalarav Deshmukh

अशोक इंगळे

सिंदखेडराजा: सहकार चळवळीत सक्रिय भूमिका बजावणारे आणि ग्रामीण राजकारणात ठसा उमटवणारे पोफळ शिवनी येथील माजी सरपंच लालाराव देशमुख यांचे बुधवारी (२५ मार्च) वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

भास्करराव शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले लालाराव देशमुख हे सहकार चळवळीतील अभ्यासू व निष्ठावान नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पोफळ शिवनी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य करत गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले.

त्यानंतर बुलढाणा जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे संचालक म्हणून पाच वर्षे काम करताना त्यांनी सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच सिंदखेडराजा तालुका खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

१९९२ साली भास्करराव शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मलकापूर पांग्रा येथून जिल्हा परिषद निवडणूक लढवून राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला. पुढे ते डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.

लालाराव देशमुख यांच्या निधनामुळे सहकार चळवळीतील एक कर्तबगार आणि अनुभवी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर गुरुवार, २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पोफळ शिवनी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परिसरात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top