Mahabreaking

[breaking_news]

A Display of Unity :रमजान ईद निमित्त ऐक्याचे दर्शन; दर्ग्यावर सामूहिक नमाज, बंधुभावाचा संदेश

A Display of Unity : पवित्र ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त बोरगाव मंजू येथे मुस्लिम बांधवांनी सण मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय एकात्मता व बंधुभावाच्या वातावरणात साजरा केला.

A Display of Unity

बोरगाव मंजू : पवित्र ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त बोरगाव मंजू येथे मुस्लिम बांधवांनी सण मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय एकात्मता व बंधुभावाच्या वातावरणात साजरा केला.
यावेळी सकाळी स्थानिक मंजू शहा बाबा दर्गा येथे मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज अदा केली. नमाजानंतर देशात अमन-शांती, सलोखा आणि समृद्धी नांदावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
मौलाना सय्यद शफकत साहेब यांनी इस्लामी शिकवणीवर मार्गदर्शन करत सामाजिक ऐक्य व मानवतेचा संदेश दिला. तसेच मौलाना जहीर साहेब यांच्या इमामतीखाली सर्वांनी ईदची नमाज अदा केली. खुतबामध्ये त्यांनी आपसी बंधुभाव जपण्याचे आणि गरजूंची मदत करण्याचे आवाहन केले.
नमाजानंतर उपस्थितांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रेम, सौहार्द आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले.
सणाच्या निमित्ताने नागरिकांनी घरी पारंपरिक पदार्थ जसे सेवई, शीरखुर्मा यांचा आस्वाद घेत आनंद साजरा केला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधांचीही योग्य व्यवस्था करण्यात आली होती.
रमजान ईदच्या निमित्ताने बोरगाव मंजू येथे अबालवृद्धांसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावत एकता, बंधुभाव आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. एकूणच, ईद-उल-फित्र शांतता, शिस्त आणि आनंदाच्या वातावरणात साजरी होत समाजात एकात्मतेचा सकारात्मक संदेश देऊन गेली.

बोरगाव मंजूत बाजार समिती परिसर,गजानन महाराज मंदिर परिसरात थांबणार बस

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top