Mahabreaking

[breaking_news]

Surprise Inspections :बोरगाव मंजू परिसरात गिट्टी खदानींवर धडक तपासणी; अवैध उत्खननाविरोधात कारवाईचे संकेत

Surprise Inspections :परिसरातील गिट्टी खदानी व खनिज उत्खननावर लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड व उपजिल्हाधिकारी (महसूल) खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.

Surprise Inspections

संजय तायडे

बोरगाव मंजू  : परिसरातील गिट्टी खदानी व खनिज उत्खननावर लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड व उपजिल्हाधिकारी (महसूल) खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेदरम्यान नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे यांनी प्रत्यक्ष खदानींवर जाऊन पाहणी केली. त्यांच्या सोबत महसूल विभागाचे पथक उपस्थित होते. यामध्ये मंडळाधिकारी निमखंडे, ग्राम महसूल अधिकारी गायवडे (भाग ३), महसूल अधिकारी चव्हाण (भाग ४) तसेच कोतवाल संतोष ठाकूर यांचा समावेश होता.

तपासणीदरम्यान खदानींचे परवाने, रॉयल्टी पास, उत्खननाची खोली तसेच पर्यावरणीय नियमांचे पालन केले जात आहे का, याची सखोल पडताळणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या खदान मालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नरेंद्र सोनवणे यांनी दिला.

या धडक कारवाईमुळे बोरगाव मंजू व परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभागाच्या या सक्रियतेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top