Mahabreaking

[breaking_news]

Youth Murdered :किरकोळ वादातून डाबकी रोडवर युवकाची हत्या, सहा तासात तीन आरोपी जेरबंद  

Youth Murdered : किरकोळ वादातून घडलेल्या खुनाच्या थरारक घटनेनंतर अकोला पोलिसांनी वेगवान आणि अचूक कारवाई करत अवघ्या ६ तासांत तिन्ही आरोपींना जेरबंद केले. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.

Youth Murdered

“तु क्या देख रहा?” वादातून खून; अकोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई

अकोला : किरकोळ वादातून घडलेल्या खुनाच्या थरारक घटनेनंतर अकोला पोलिसांनी वेगवान आणि अचूक कारवाई करत अवघ्या ६ तासांत तिन्ही आरोपींना जेरबंद केले. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.

डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ मार्चच्या मध्यरात्री ही घटना घडली. फिर्यादी शेख तनवीर शेख नासीर (वय १९) व त्याचा मित्र मविस अमन मो. आजम हे सिगारेट पिण्यासाठी डाबकी रोडवरील पानपट्टीवर गेले होते. यावेळी आरोपी अर्जुन नरेंद्र धनावत हा त्यांच्यासोबत उभा होता. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने अचानक हिंसक वळण घेतले. “तु मेरे तरफ क्या देख रहा” असे म्हणत आरोपी अर्जुन धनावत व त्याच्या दोन साथीदारांनी मिळून मृतक मविसवर हल्ला चढवला. मारहाणीनंतर आरोपींनी मविसच्या पोटात चाकूने वार करत त्याला जागीच ठार केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची गंभीरता ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत तपासावर लक्ष केंद्रीत केले. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांची एकूण ८ पथके तयार करण्यात आली. तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे खदान पोलीस पथकाने आरोपी अर्जुन धनावत (२३), अनिकेत संजय बाळापुर (१८) व विशाल दिलीप सिरसोले (२३) यांना अटक केली. त्यानंतर तिघांनाही डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईत पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस निरीक्षक दीपक कोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  अत्यंत कमी वेळेत गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना अटक केल्याने अकोला पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top