Mahabreaking

[breaking_news]

Lightning Strikes Dongav :डोणगावात विजेचा तडाखा; खंडोबा मंदिराचे नुकसान, मोठा अनर्थ टळला!

Lightning Strikes Dongav :डोणगाव परिसरात आज सकाळी अचानक बदललेल्या हवामानाने थरार उडवला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावताच परिसर दणाणून गेला. दरम्यान, सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास आरेगाव रोडवरील वार्ड क्रमांक २ मधील खंडोबा मंदिरावर विज कोसळल्याने मोठी खळबळ उडाली.

Lightning Strikes Dongav
डोणगाव : डोणगाव परिसरात आज सकाळी अचानक बदललेल्या हवामानाने थरार उडवला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावताच परिसर दणाणून गेला. दरम्यान, सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास आरेगाव रोडवरील वार्ड क्रमांक २ मधील खंडोबा मंदिरावर विज कोसळल्याने मोठी खळबळ उडाली.
या भीषण तडाख्यात मंदिराचा एक कोपरा खचला असला, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, याच वेळी मंदिरात पूजा करत असलेल्या मंगलाताई लक्ष्मण काळे या थोडक्यात बचावल्या. क्षणभरासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळपासून सुरू असलेल्या विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. मोठमोठ्या आवाजांमुळे अनेकजण घराबाहेर पडण्यास घाबरत होते. त्यातच मंदिरावर विज पडल्याची बातमी समोर येताच गावात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून नुकसानीचा आढावा घेतला.
दरम्यान, विज मंदिरावर पडल्याने “देवाने संकट स्वतःवर घेतले” अशी भावनिक चर्चा गावात रंगू लागली आहे. मात्र, या घटनेने नैसर्गिक आपत्तींचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित केला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top