Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Water Kiosk :डोणगावात तहानलेल्या प्रवाशांसाठी पाणपोई; महेश अर्बन परिवाराचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

Water Kiosk :उन्हाळ्याची चाहूल लागताच वाढत्या तापमानामुळे प्रवासी आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी गरज भासू लागते. ही गरज लक्षात घेऊन डोणगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महेश परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत तहानलेल्या प्रवाशांच्या सेवेसाठी पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

Water Kiosk

डोणगाव : उन्हाळ्याची चाहूल लागताच वाढत्या तापमानामुळे प्रवासी आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी गरज भासू लागते. ही गरज लक्षात घेऊन डोणगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महेश परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत तहानलेल्या प्रवाशांच्या सेवेसाठी पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

दि. १६ मार्च रोजी स्थानिक महेश अर्बन बँकेसमोर, बसस्थानक परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवासी तसेच नागरिकांसाठी आरओ पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली. महेश अर्बन परिवाराचे डॉ. महेश लोहीया आणि महेश अर्बन बँकेचे अध्यक्ष गोपाल मोदाणी यांच्या प्रेरणेने हा सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवला जातो. या उपक्रमामुळे उन्हाच्या कडाक्यातही अनेक प्रवासी व नागरिकांची तहान भागवली जात आहे.

महेश अर्बन बँकेची शाखा सुरू झाल्यापासून डोणगाव शाखेचे व्यवस्थापक गजानन डोंगरदिवे व बँकेचे कर्मचारी सातत्याने या उपक्रमात पुढाकार घेत आहेत. बसस्थानक परिसरात लावण्यात आलेली ही पाणपोई प्रवासी, नागरिक आणि परिसरातील लोकांसाठी दिलासा ठरत आहे.

या पाणपोईचे उद्घाटन आरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष टाले, डोणगावचे दीपक पळसकर, अभिजीत पळसकर, महेश अर्बनचे संचालक सुरेश फिसके, डोणगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे तसेच महेश अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक गजानन डोंगरदिवे व बँक कर्मचाऱ्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

बँक स्थापनेपासून सुरू असलेली ही सेवा आजही अखंडपणे सुरू असून उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांची तहान भागवण्याचे कार्य ही पाणपोई करत आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत महेश अर्बन परिवाराने राबवलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top