Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Revenue Grievance Redressal Camp :मेहुना राजात ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात; ६९ दाखल्यांचे जागेवरच वाटप

Revenue Grievance Redressal Camp :तालुक्यातील मेहुना राजा येथे महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ शनिवारी (१४ मार्च) उत्साहात पार पडले. या शिबिराला राजस्व मंडळ मेहुना राजा अंतर्गत येणाऱ्या १४ गावांतील शेतकरी, कास्तकार, सरपंच, पोलीस पाटील व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

Revenue Grievance Redressal Camp

 १४ गावांतील शेतकरी व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती; विविध योजनांची माहिती व आरोग्य तपासणी

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यातील मेहुना राजा येथे महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ शनिवारी (१४ मार्च) उत्साहात पार पडले. या शिबिराला राजस्व मंडळ मेहुना राजा अंतर्गत येणाऱ्या १४ गावांतील शेतकरी, कास्तकार, सरपंच, पोलीस पाटील व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ होत्या. यावेळी नायब तहसीलदार सायली जाधव, भूमी अभिलेख विभागाचे खेडेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी वायळ, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तारा मुंढे यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक जायभाये व म्हस्के आणि शिक्षक उपस्थित होते.

शिबिरामध्ये नागरिकांना एकूण ६९ विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे जागेवरच देण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजना, शासकीय निर्णय आणि महसूल विभागाच्या सेवा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. महसूल मंडळ अधिकारी विजय हिरवे यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर महसूल सेवक शरद काकडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, संत चोखामेळा यांचे चरित्र दर्शन आदी सामाजिक विषयांवर आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

अध्यक्षीय भाषणात तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी महाराजस्व अभियानामागील शासनाची भूमिका आणि या शिबिराचा उद्देश विशद करत नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

दरम्यान, या शिबिरात रस्त्याच्या कामासंदर्भात सात अर्ज प्राप्त झाले. तसेच उपस्थित शेतकरी व नागरिकांची आरोग्य तपासणी करून मधुमेह तपासणीही करण्यात आली. या शिबिराला निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी भेट देऊन विविध विभागांच्या स्टॉल्सची पाहणी केली, सूचना दिल्या तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्राम महसूल अधिकारी हांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top