Mahabreaking

[breaking_news]

Body of an unidentified :समृद्धी महामार्गालगत ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला 

Body of an unidentified : डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अंजनी बु. गावच्या शेतशिवारात समृद्धी महामार्गालगत सुमारे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना १३ मार्च रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Body of an unidentified

डोणगाव : डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अंजनी बु. गावच्या शेतशिवारात समृद्धी महामार्गालगत सुमारे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना १३ मार्च रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास अंजनी बु. येथील पोलीस पाटील अर्जुनराव हरीभाऊ टोनपे यांना समृद्धी महामार्गाच्या चॅनेल क्रमांक २७५ जवळील रस्त्याच्या नालीत एक अनोळखी इसम मृतावस्थेत पडलेला असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ याबाबत डोणगाव पोलिसांना माहिती दिली.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे असून बांधा मजबूत, केस काळे आणि दाढी वाढलेली आहे. त्याने अंगात काळ्या रंगाचा पांढऱ्या रेषा असलेला टी-शर्ट व निळ्या रंगाची पँट परिधान केलेली असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस पाटील अर्जुनराव टोनपे यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस ठाण्यात मर्ग नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही. ठाणेदारांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय घिके करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top