Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

HSC exam conducted  :अंजुमन कनिष्ठ महाविद्यालयात एचएससी परीक्षा शांततेत; ४२६ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

HSC exam conducted  :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेली फेब्रुवारी-मार्च २०२६ ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षा येथील अंजुमन कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या परीक्षेची सुरुवात १० फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाच्या पहिल्या प्रश्नपत्रिकेने झाली होती, तर शेवटचा पेपर समाजशास्त्र विषयाचा घेण्यात आला.

HSC exam conducted

जाकीर अहमद

बाळापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेली फेब्रुवारी-मार्च २०२६ ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षा येथील अंजुमन कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या परीक्षेची सुरुवात १० फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाच्या पहिल्या प्रश्नपत्रिकेने झाली होती, तर शेवटचा पेपर समाजशास्त्र विषयाचा घेण्यात आला.

या परीक्षा केंद्रावर विज्ञान व कला शाखेतील एकूण ४२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी विज्ञान शाखेचे ३२६ तर कला शाखेचे १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासह शिस्तीचेही वातावरण दिसून आले.

या केंद्रावर घानाबाई विद्यालय, शेलद कनिष्ठ महाविद्यालय, मनोरमा कला-विज्ञान-वाणिज्य महाविद्यालय, यशोदाबाई महाविद्यालय व्याळा, बेनाबाई महाविद्यालय, हुस्सामिया कनिष्ठ महाविद्यालय, जफर-नक्शबंदी महाविद्यालय तसेच अंजुमन कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख ठेवण्यात आली होती. तसेच प्रशासनाच्या वतीने पोलिस व होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण परीक्षा कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

परीक्षेदरम्यान मंडळाचे प्रतिनिधी, परीक्षा पथक तसेच संबंधित अधिकारी वेळोवेळी केंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी करत होते.

या वेळी केंद्र संचालक जफर हुसेन शेख तसेच सहाय्यक शोएब मोहम्मद खान यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. केंद्र प्रशासन व शिक्षकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही. परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडल्याने पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top