Mahabreaking

[breaking_news]

Property seized :जमीन महसूल थकबाकी प्रकरणी मालमत्ता जप्त; १७ मार्चला जाहीर लिलाव

Property seized : जमीन महसूल थकबाकीच्या वसुलीसाठी मौजे किनगावराजा (ता. सिंदखेडराजा) येथील गट क्रमांक ७८५ मधील मालमत्ता जप्त करण्यात आली असून सदर मालमत्तेचा जाहीर लिलाव दि. १७ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय, सिंदखेडराजा येथे होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कसूरदार सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदखेडराजा यांच्याकडून येणे असलेल्या जमीन महसूल थकबाकीच्या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मौजे किनगावराजा येथील गट क्रमांक ७८५, क्षेत्रफळ ०.८२ हेक्टर व आकार रु. ७.५० असलेली मालमत्ता प्रशासनाने जप्त केली आहे.

Property seized
साखरखेर्डा : जमीन महसूल थकबाकीच्या वसुलीसाठी मौजे किनगावराजा (ता. सिंदखेडराजा) येथील गट क्रमांक ७८५ मधील मालमत्ता जप्त करण्यात आली असून सदर मालमत्तेचा जाहीर लिलाव दि. १७ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय, सिंदखेडराजा येथे होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अंगणवाडी व आशा सेविकांचा थकीत प्रोत्साहन भत्ता द्या;  भाग्यश्री खेडेकर यांचे निवेदन

कसूरदार सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदखेडराजा यांच्याकडून येणे असलेल्या जमीन महसूल थकबाकीच्या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मौजे किनगावराजा येथील गट क्रमांक ७८५, क्षेत्रफळ ०.८२ हेक्टर व आकार रु. ७.५० असलेली मालमत्ता प्रशासनाने जप्त केली आहे.
निश्चित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी संबंधित देय रक्कम भरली गेली नाही, तर सदर मालमत्ता तिच्यावर असलेल्या सर्व भार, अनुदाने व संविदांपासून मुक्त करून जाहीर लिलावाद्वारे विक्रीस काढण्यात येणार आहे. हा लिलाव दि. १७ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता किंवा त्यानंतर तहसील कार्यालय, सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे होणार आहे. इच्छुक नागरिकांनी नमूद दिनांक व वेळेस उपस्थित राहून लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
दरम्यान, हे प्रकरण तत्कालीन सचिव हरिभाऊ कोल्हे यांच्या कार्यकाळातील असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात व्यवहारात अपेक्षित पारदर्शकता राखली गेली नाही तसेच काही कर्मचाऱ्यांचे वेतनही प्रलंबित राहिले होते. वेतन मिळण्यासाठी संबंधितांनी न्यायालयात धाव घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top