Mahabreaking

[breaking_news]

Bhagyashree Khedekar :अंगणवाडी व आशा सेविकांचा थकीत प्रोत्साहन भत्ता द्या;  भाग्यश्री खेडेकर यांचे निवेदन

Bhagyashree Khedekar :कोरोना महामारीच्या कठीण काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या साखरखेर्डा व सिंदखेड राजा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस यांना शासनाने जाहीर केलेला कोरोना प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या युवा नेत्या डॉ. भाग्यश्री खेडेकर यांनी केली आहे.

Bhagyashree Khedekar

गजानन भालेकर

धोत्रा नंदई   : कोरोना महामारीच्या कठीण काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या साखरखेर्डा व सिंदखेड राजा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस यांना शासनाने जाहीर केलेला कोरोना प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा, अशी मागणी शिवसेनेच्या युवा नेत्या डॉ. भाग्यश्री खेडेकर यांनी केली आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात गावपातळीवर जनजागृती करणे, महाआयुष सर्वेक्षण राबविणे, स्थलांतरित नागरिकांची माहिती संकलित करणे तसेच कोविड-१९ संदर्भातील विविध शासकीय कामे अंगणवाडी व आशा सेविकांनी अहोरात्र परिश्रम घेऊन पार पाडली. संकटाच्या काळात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या कार्याची दखल घेत शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा एक हजार रुपये प्रमाणे २३ महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत परिपत्रकाद्वारे निर्देश दिले होते. तसेच १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषदेकडूनही यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.

मात्र साखरखेर्डा व सिंदखेडराजा मतदारसंघातील अनेक अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि मदतनीस यांना अद्यापही हा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना देय असलेला थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा, अशी मागणी डॉ. भाग्यश्री खेडेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या अंगणवाडी व आशा सेविकांना त्यांचा हक्काचा भत्ता लवकर मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

समस्या मांडताच २४ तासांत दखल

दि. ९ मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरखेर्डा येथे महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात आशा सेविका व अंगणवाडी सेविकांनी आपली समस्या मांडली. त्यानंतर अवघ्या २४ तासांत या प्रश्नाची दखल घेत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला, अशी माहिती डॉ. भाग्यश्री खेडेकर यांनी दिली.

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top