Woman beaten up : दुकानात शिरून एका महिलेला अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ मार्च रोजी सायंकाळी मेहुणाराजा येथे घडली.

देऊळगाव राजा : दुकानात शिरून एका महिलेला अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ मार्च रोजी सायंकाळी मेहुणाराजा येथे घडली.
याप्रकरणी दगडवाडी येथील 28 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून उद्धव उत्तम सुरडकर (वय ३४), धोडिंबा सिताराम बनसोडे (वय ३८), अमोल मुर्कीदा बनसोडे (वय २५) आणि संतोष सुरडकर (वय २५), सर्व रा. सुरा ता. देऊळगाव राजा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या दुकानात असताना आरोपी तेथे आले. त्यांनी “तुझा नवरा कुठे आहे?” अशी विचारणा करत शिवीगाळ सुरू केली. फिर्यादीने त्यांना शिवीगाळ करू नका, असे सांगितले असता आरोपींनी अश्लील शिवीगाळ व धमक्या देत वाद वाढविला.
यावेळी आरोपींनी आपल्याला मारहाण केल्याने महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी महिलेला आरोपींच्या तावडीतून सोडविले.
घटनेनंतर आरोपींनी “तुझ्या नवऱ्याला समजावून सांग, नाहीतर त्याला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत एमएच-४६-सीव्ही-८३९९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने तेथून पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ७४, २९६, ११५(१), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदविण्याची कारवाई पोलिस हवालदार गणेश जायभाये यांनी केली असून पुढील तपास पोलिस हवालदार शरद साळवे करत आहेत.

