Mahabreaking

[breaking_news]

Bus catches fire :नांदुरा शहरात धावत्या बसला आग; चालकाच्या सतर्कतेने ३० प्रवाशी बचावले

Bus catches fire : इंदूर–अकोला राष्ट्रीय मार्गावर नांदुरा शहरातील आशीर्वाद हॉटेलसमोर धावत्या खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी (दि. ७ मार्च) पहाटे घडली. बसमध्ये सुमारे ३० प्रवासी प्रवास करत होते; मात्र चालक व स्थानिकांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.

Bus catches fire

इंदुरवरून अकोल्याकडे जात असताना बसने घेतला पेट, चालक आणि स्थानिक नागरिकांची सतर्कता

नांदुरा : इंदूर–अकोला राष्ट्रीय मार्गावर नांदुरा शहरातील आशीर्वाद हॉटेलसमोर धावत्या खासगी बसला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी (दि. ७ मार्च) पहाटे घडली. बसमध्ये सुमारे ३० प्रवासी प्रवास करत होते; मात्र चालक व स्थानिकांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण ठार, एक गंभीर

मिळालेल्या माहितीनुसार, एनएल ०७ बी ०६९४ क्रमांकाची खासगी बस इंदूरहून अकोल्याकडे जात होती. पहाटे सुमारे ६ वाजताच्या सुमारास बस नांदुरा शहरातील आशीर्वाद हॉटेलसमोर आली असताना अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला. काही क्षणांतच धूर वाढत जाऊन बसला आग लागली. परिस्थितीची जाणीव होताच चालकाने तातडीने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले.

घटनेची माहिती मिळताच नांदुरा अग्निशामक दलाचे जवान, नांदुरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी, ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक तसेच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात आल्याने संभाव्य मोठा अपघात टळल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बसला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी नांदुरा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top