Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Uddhav Sena warns:“शेतमालाचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवा, अन्यथ आंदोलन;उद्धवसेनेचा इशारा

Uddhav Sena warns: खरीप हंगामातील मका, सोयाबीन आणि कापूस खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत नाफेड आणि सीसीआयची खरेदी केंद्रे बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात शेतमाल घरात पडून आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत खरेदी केंद्रे तातडीने सुरू ठेवावीत, अशी मागणी उद्धवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

Uddhav Sena warns

खरेदीचे उद्दिष्ट संपले, पण शेतकऱ्यांचा माल घरातच: जिल्हाधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

 बुलढाणा :खरीप हंगामातील मका, सोयाबीन आणि कापूस खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत नाफेड आणि सीसीआयची खरेदी केंद्रे बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात शेतमाल घरात पडून आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत खरेदी केंद्रे तातडीने सुरू ठेवावीत, अशी मागणी उद्धवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २०२५-२६ च्या खरीप हंगामात बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ५२ हजार ८५५ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड झाली आहे. नाफेडच्या निकषानुसार हेक्टरी ३९ क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यात सुमारे २० लाख क्विंटलपेक्षा अधिक मका उत्पादन अपेक्षित आहे. मात्र यासाठी केवळ ६० हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

सुमारे ५ हजार ७०० शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही अनेक खरेदी केंद्रांवर उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत मका खरेदी थांबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे बाजारभाव घसरत असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे उद्धवसेनेचे म्हणणे आहे.

याशिवाय सोयाबीनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे पडून असून त्याची खरेदीही प्रभावीपणे होत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. कापसाच्या बाबतीतही खुल्या बाजारातील दर अनिश्चित असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रांना प्राधान्य दिले; मात्र ती केंद्रेही बंद होत असल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सरकारवर सडकून टीका केली. शेतकरी आजही हमीभाव, कर्जाचा बोजा आणि खरेदी केंद्रांच्या अनियमिततेमुळे त्रस्त आहे. अनेक ठिकाणी खरेदी केंद्रे वेळेआधी बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा माल पडून राहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले; मात्र सत्तेत आल्यानंतर त्या आश्वासनाचा पूर्ण विसर पडल्यासारखे वागले जात आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकार मात्र गप्प बसले आहे,” असा घणाघाती आरोपही बुधवत यांनी केला. शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतीमाल खरेदी होईपर्यंत सर्व खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत, अन्यथा येत्या काळात शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या घरातील शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत सर्व खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही उद्धवसेनेच्या वतीने देण्यात आला.निवेदन देताना पक्ष प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदरभाऊ बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, नगराध्यक्ष किशोर गारोळे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, सहसंपर्क प्रमुख वसंतराव भोजने, जिल्हा संघटक डी. एस. लहाने, जिल्हा संघटक सुमित सरदार, तालुकाप्रमुख दादाराव खार्डे, तालुकाप्रमुख श्रीकिसन धोंडगे, तालुकाप्रमुख विजय इतवारे, तालुकाप्रमुख विजय  इंगळे, तालुकाप्रमुख निंबाजी  पांडव, तालुकाप्रमुख राजूभाऊ बुधवत, दीपक  चांभारे, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, युवासेना तालुकाप्रमुख मोहित  राजपूत, युवासेना तालुकाप्रमुख सिद्धेश्वर आंधळे, नितेश  देशमुख, शहरप्रमुख हरिदास गणबास, नारायण हेलगे, रफिकभाई बर्तनवाले, सैय्यद वशीम, बाळूभाऊ लोखंडे, महादेव पवार, गजानन मेहेत्रे, विश्वनाथ पुरकर, सत्तार शहा, पर्वेश साहब, हरिभाऊ सिनकर, सुधाकर आघाव, गजानन धांडे, भगवान नरोटे, निलेश तायडे, रफिक शेख, सुनील भाग्यवंत, विजय राऊत, दिलीप राजभोज, पंजाबराव गवई, बबन खरे, किरण पाटील, संदीप जाधव, चांगदेव जाधव, मो. सोफियान, गजानन गवई, संजय गवळी, निलेश हरकल, गौरव देशमुख, गजानन मुळे, काशिनाथ बिचकुले, विनोद ढोण (मामा), निर्मल इंगळे, गणेश शेवाळकर, रामदास सपकाळ, संतोष डब्बे, मधुकर महाले, प्रकाश डोंगरे, दीपक पिंपळे, गणेश रिंढे, श्रीकांत जाधव, अरविंद डहाके, नागेश पऱ्हाड, रुपेश लकडे. तसेच महिला उपजिल्हाप्रमुख प्रतीक्षाताई पिंपळे, अनिता गायकवाड, अर्चना शेळके, अर्चना गायकवाड, रत्ना शेळके, पल्लवी शेळके, स्मिता वराडे, सविता बैरागी, नीता चव्हाण, सुवर्णा जाधव, मनिषा इंगळे, भारती भारंभे, सुनीता सुरडकर, स्वाती लाहोडकर, रोशनी गरड, श्रद्धा दाभाडे, वैशाली मिसाळ, पूजा शिंगणे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top