Mahabreaking

🔴 BREAKING
Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद

Demand for full-time chief officer :बाळापूर नगर परिषदेत पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची मागणी; दोन वर्षांपासून पद रिक्त

Demand for full-time chief officer :नगर परिषदेत गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर तसेच शहरातील विकासकामांवर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी जिल्हाधिकारी Varsha Meena यांना निवेदन देत नगर परिषदेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.

Demand for full-time chief officer

जाकीर अहमद 

 बाळापूर :  नगर परिषदेत गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर तसेच शहरातील विकासकामांवर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी जिल्हाधिकारी Varsha Meena यांना निवेदन देत नगर परिषदेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, (ब) श्रेणीची नगर परिषद असतानाही येथे दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत. परिणामी विविध विभागांतील प्रशासकीय समन्वय कमकुवत झाला असून दैनंदिन कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रस्त्यांची कामे तसेच रस्त्यावरील दिव्यांची देखभाल यांसारख्या मूलभूत सुविधांमध्येही अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात पुढे असेही नमूद केले आहे की, नगर परिषदेच्या घरभाडे, पाणीपट्टी तसेच टाक्या व दुकानांच्या भाड्यांची मोठी थकबाकी प्रलंबित आहे. तसेच अनेक ठेकेदारांची कामे पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या बिलांचे देयक दीर्घकाळापासून थकीत असल्याने नवीन विकासकामे सुरू करण्यात अडथळे येत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, नगर परिषदेत पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यास प्रशासनाला गती मिळेल आणि प्रलंबित कामांना चालना मिळेल. अन्यथा प्रशासकीय कामकाज आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नगर परिषदेत लवकरात लवकर पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अन्यथा नागरिक व सामाजिक संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र जुमळे, इरशाद अहमद, योगेश धनोकार, अयुब शाह, संजय ओमळे, अब्दुल गफ्फार (सज्जाद) यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top