Mahabreaking

[breaking_news]

MIMs Pungi Bajao movement :खामगाव नगरपरिषदेत एमआयएमचे ‘पुंगी बजाओ’ आंदोलन; पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नांवर संताप 

MIMs Pungi Bajao movement : शहरातील प्रभाग क्रमांक १२ तसेच फाटकपुरा व दाळफैल परिसरातील मूलभूत नागरी समस्यांकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत एमआयएम पक्षाच्या वतीने शुक्रवारी खामगाव नगरपरिषदेत ‘पुंगी बजाओ’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना सादर करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली.

MIMs Pungi Bajao movement

खामगाव : शहरातील प्रभाग क्रमांक १२ तसेच फाटकपुरा व दाळफैल परिसरातील मूलभूत नागरी समस्यांकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत एमआयएम पक्षाच्या वतीने शुक्रवारी खामगाव नगरपरिषदेत ‘पुंगी बजाओ’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना सादर करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली.

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट : सुटाळा बु. येथे भावानेच भावाचा घेतला जीव

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, फाटकपुरा व दाळफैल परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही भागातच पाणीपुरवठा होत असून उर्वरित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत आहे. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने उपवास करणाऱ्या नागरिकांना पाण्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

याशिवाय फाटकपुरा भागात स्वच्छतेच्या समस्याही गंभीर झाल्या आहेत. सफाई कामगारांची कमतरता असल्याने नाल्यांची नियमित साफसफाई होत नाही. अनेक ठिकाणी पंधरा-पंधरा दिवस नाल्यांची साफसफाई होत नसल्याने परिसरात अस्वच्छता वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी तक्रारही करण्यात आली.

तसेच मस्तान चौकातील मशिदीजवळील नाल्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने नमाजासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मशिदीच्या परिसरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करून स्वच्छतेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी शहरातील स्थावर मालमत्तांवर लावण्यात आलेला वाढीव कर तातडीने रद्द करावा, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात मो. आरीफ, शेख नजर, शेख दाऊद, शेख सलाम, अब्दुल अजीज, शेख रिजवान, मोहम्मद आयुब, शेख फरीद यांच्यासह एमआयएमचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top