Mahabreaking

🔴 BREAKING
Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले

burglary attempt : बीबी येथे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या घरात भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न झाला. मात्र घरमालकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्याला घरातच बंदिस्त करण्यात आले आणि पोलिसांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Daytime burglary attempt

रमेश खंडागळे

बीबी  : बीबी येथे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या घरात भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न झाला. मात्र घरमालकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्याला घरातच बंदिस्त करण्यात आले आणि पोलिसांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बीबी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत नंदाजी कांगणे हे ४ मार्च रोजी सकाळची शाळा आटोपून दुपारी सुमारे १२ वाजता घराला कुलूप लावून पत्नीसमवेत गहू कापणीसाठी कुंबेफळ येथील शेतात गेले होते. दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता घराचे कुलूप लोखंडी रॉडने तोडलेले दिसले.

कांगणे यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता आत कोणीतरी असल्याची चाहूल लागल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ दरवाजा बाहेरून बंद करून चोरट्याला घरातच कोंडून ठेवले. त्यानंतर त्यांनी बीबी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी सानप यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. दरम्यान, चोरट्याचे दोन साथीदार भंगार गोळा करणाऱ्यांच्या वेशात बाहेरून रेकी करत होते; मात्र ते तेथून पसार झाले.

माहिती मिळताच ठाणेदार एपीआय चंद्रकांत पाटील यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि घरात बंदिस्त केलेल्या चोरट्याला रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ हजार रुपये किमतीचा निळ्या रंगाचा रियलमी मोबाईल आणि ६ हजार रुपये रोख असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, चोरट्याने घरातील कपाटातील कपडे व कागदपत्रांची फाडाफाड करून नुकसान केले असून काही सोने-चांदीचे दागिनेही पिशवीत भरून ठेवले होते, अशी माहिती सूर्यकांत कांगणे यांनी दिली.

पोलिसांनी आरोपी तेजस सुरेश वैद्य (रा. गणेश नगर, गारखेडा, संभाजीनगर) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ३३१(१) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश चव्हाण व अन्य कर्मचारी करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top