Mahabreaking

🔴 BREAKING
Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद

Marathi Language Pride Day :जिजामाता महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात

Marathi Language Pride Day :स्थानिक जिजामाता महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन चांगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी स्वरचित कवितांद्वारे मराठी भाषेचा गौरव व्यक्त केला.

Marathi Language Pride Day
बुलढाणा : स्थानिक जिजामाता महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन चांगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी स्वरचित कवितांद्वारे मराठी भाषेचा गौरव व्यक्त केला.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाची दारे खुली; माजी विद्यार्थ्याने आयोजित केली रोबोटिक्स कार्यशाळा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जे. जे. जाधव होते. तर प्रमुख अतिथी म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. नामदेव ढाले आणि प्रा. डॉ. सुबोध चिंचोले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रेया इंगळे हिने ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर करत कार्यक्रमाला रंगत आणली. पुढे विविध विषयांच्या प्राध्यापकांनीही आपल्या रचनांद्वारे मराठी भाषेप्रती असलेले प्रेम व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन श्रेया इंगळे हिने केले, तर प्रणाली वानखडे हिने आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top