Mahabreaking

[breaking_news]

Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ

Revenue Satisfaction Camp : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे दैनंदिन प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार देऊळगाव राजा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ (टप्पा १) अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Revenue Satisfaction Camp

नागरिकांच्या तक्रारींवर ‘ऑन द स्पॉट’ तोडगा

देऊळगाव राजा : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे दैनंदिन प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार देऊळगाव राजा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ (टप्पा १) अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

तालुका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार शिबिरांचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे. मंडळ स्तरावरील शिबिरे: ७ मार्च व १४ मार्च २०२६, तालुका स्तरावरील शिबिरे: १० एप्रिल ते १७ एप्रिल २०२६ ,नगर परिषद व नगर पंचायत स्तरावरील शिबिरे: ८ मे ते १५ मे २०२६

या सेवांचा मिळणार लाभ

या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, ‘लोकसेवा हक्क कायदा’ अंतर्गत तत्काळ सेवा प्रदान करणे, डिजिटल ७/१२ बाबत जनजागृती तसेच अकृषक (एन.ए.) परवानगी प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे.

याशिवाय भोगवटादार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन व आदेशांचे वितरण करण्यात येणार आहे. ‘Ease of Doing Business’ उपक्रमांतर्गत तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी असे सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणार आहेत. तसेच ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील त्रुटीही याठिकाणी दूर केल्या जाणार आहेत.देऊळगाव राजा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी संबंधित महसूल मंडळ स्तरावर आयोजित शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top