Mahabreaking

🔴 BREAKING
Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम

The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले

The pilgrimage began : जिल्ह्यातील सैलानी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत हाजी अब्दुल रहिमान उर्फ सैलानी बाबा यांच्या यात्रेला भक्तिभावाने प्रारंभ झाला. सोमवार, २ मार्च रोजी दुपारी पारंपरिक पद्धतीने लाखो नारळांची होळी पेटवून यात्रेची सुरुवात करण्यात आली. सुमारे पाच ट्रकभर नारळ होळीत अर्पण करण्यात आले.

The pilgrimage began
राज्याबाहेरूनही भाविकांची उपस्थिती; यात्रेत सामाजिक ऐक्याचे दर्शन

पिंपळगाव सराई : जिल्ह्यातील सैलानी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत हाजी अब्दुल रहिमान उर्फ सैलानी बाबा यांच्या यात्रेला भक्तिभावाने प्रारंभ झाला. सोमवार, २ मार्च रोजी दुपारी पारंपरिक पद्धतीने लाखो नारळांची होळी पेटवून यात्रेची सुरुवात करण्यात आली. सुमारे पाच ट्रकभर नारळ होळीत अर्पण करण्यात आले.

जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार

देशभरातील विविध धर्म व पंथांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निरोगी आयुष्य व मनोकामना पूर्ण होण्यासाठी होळीत नारळ व पूजासाहित्य अर्पण केले. सैलानी यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्रद्धा आणि सामाजिक सलोखा. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक येथूनही भाविक येथे दाखल झाले.
यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेकडो पोलिस कर्मचारी, होमगार्ड तसेच आरोग्य विभागाचे पथक भाविकांच्या सेवेत कार्यरत होते. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दल व जेसीबी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली होती.
८ मार्च रोजी सैलानी बाबांचा पारंपरिक संदल सोहळा उंटावरून मिरवणुकीने पार पडणार आहे. यात्रेच्या निमित्ताने गावात पाणी, वैद्यकीय मदत व सुरक्षेची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचे दर्शन घडवणारी ही यात्रा पुढील पंधरा दिवस सुरू राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top