Mahabreaking

[breaking_news]

18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त

18 meters seized : वीज बिलाचा सातत्याने भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात महावितरणने वरवट बकाल (ता. संग्रामपूर) वितरण केंद्राअंतर्गत सामूहिक कारवाई सुरू केली आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच काही ठिकाणी थेट वीज मीटर काढून जप्त करण्यात आले आहेत. “वीज बिल भरले नाही तर वीजही मिळणार नाही” अशी भूमिका नाईलाजास्तव घ्यावी लागल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

18 meters seized
वरवट बकाल केंद्रांतर्गत कारवाई : ३,८९९ ग्राहकांकडे १.८१ कोटींची थकबाकी

बुलढाणा : वीज बिलाचा सातत्याने भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात महावितरणने वरवट बकाल (ता. संग्रामपूर) वितरण केंद्राअंतर्गत सामूहिक कारवाई सुरू केली आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच काही ठिकाणी थेट वीज मीटर काढून जप्त करण्यात आले आहेत. “वीज बिल भरले नाही तर वीजही मिळणार नाही” अशी भूमिका नाईलाजास्तव घ्यावी लागल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी केले आहे.
संग्रामपूर उपविभागातील वरवट बकाल वितरण केंद्राअंतर्गत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा एकूण ३,८९९ ग्राहकांकडे १ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या निर्देशानुसार ही सामूहिक कारवाई हाती घेण्यात आली.
कारवाईदरम्यान ७३ ग्राहकांनी ६ लाख २१ हजार रुपयांचा भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्यापासून बचाव केला. तर १८ ग्राहकांचे वीज मीटर काढून जप्त करण्यात आले. त्यापैकी १३ ग्राहकांनी तत्काळ थकबाकी भरल्यानंतर त्यांच्या ठिकाणी नव्या स्मार्ट मीटरची बसवणूक करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

अनधिकृत वीज वापरास आळा
ज्या ग्राहकांचे मीटर काढण्यात आले आहे, त्यांनी शेजारच्या घरातून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळल्यास वीज घेणारा आणि देणारा अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही महावितरणने दिला आहे. थकबाकी वसुलीसाठीची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top