Mahabreaking

🔴 BREAKING
Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम

The cultural program :‘किलबिल पाखरांची’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

The cultural program : तालुक्यातील जानेफळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने ‘किलबिल पाखरांची’ या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

The cultural program

मेहकर : तालुक्यातील जानेफळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने ‘किलबिल पाखरांची’ या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश मुरडकर, उपाध्यक्षा मीराताई जयराज चव्हाण, मुख्याध्यापक विश्वनाथ मगर, जानेफळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार आजिनाथ मोरे, तुळजाई उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. केशव अवचार, अंबिका महिला अर्बनचे अध्यक्ष मोहन पाटील धोटे, जानेफळच्या सरपंच सौ. रुपालीताई गजानन वडणकर, तुळजाई महिला अर्बनच्या अध्यक्षा सौ. प्रिती केशव अवचार, सामाजिक कार्यकर्ते प्रा. कृष्णा हावरे, डॉ. शिवानंद साखरे, ग्रामपंचायत सदस्य मंटू राजुरकर, जानेफळ प्रेस क्लबचे अध्यक्ष मनीष मांडवगडे, पत्रकार अमर राऊत, गणेश सवडतकर, विशाल फितवे, डॉ. श्रीकृष्ण काकडे, रविंद्र वाघ, ग्रामपंचायत सदस्य भारत घायवट, बंडू केदारे, प्रदीप कृपाळ, रवि सवडतकर, राजू अवचार, दीपक आडवे, देवानंद वानखेडे, अमोल नवले यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी नृत्य, गीते, नाटिका आदी विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मगर व शिक्षिका संगीता राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक विश्वनाथ मगर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामेश्वर राठोड, सुरेश चव्हाण, नंदकिशोर बळी, संगीता राऊत, जगदीश पठाडे, सौ. शिला पाटील, ज्योती तेलंग, महेश तेजराव निकस आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top