Mahabreaking

🔴 BREAKING
Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम

Janata Vidyalaya :जनता विद्यालयात नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा

Janata Vidyalaya : होळी व धुलीवंदन या सणांच्या पार्श्वभूमीवर सिनगाव जहागीर येथील जनता विद्यालयातील वसुंधरा इको क्लबच्या प्रमुख वनश्री जनाबापू मेहेत्रे यांच्या वतीने पर्यावरणपूरक पद्धतीने होळी व धुलीवंदन साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले.

Janata Vidyalaya

वनश्री जनाबापू मेहेत्रे यांचे इको-फ्रेंडली होळीचे आवाहन

देऊळगाव राजा : होळी व धुलीवंदन या सणांच्या पार्श्वभूमीवर सिनगाव जहागीर येथील जनता विद्यालयातील वसुंधरा इको क्लबच्या प्रमुख वनश्री जनाबापू मेहेत्रे यांच्या वतीने पर्यावरणपूरक पद्धतीने होळी व धुलीवंदन साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना ही जबाबदारी निर्माण करणारी एक सशक्त चळवळ :  नंदाताई कायंदे

होळी व धुलीवंदन हे सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र होळीच्या निमित्ताने काही ठिकाणी नामवंत वृक्षांची तसेच जातिवंत लाकडांची जाळपोळ केली जाते. शिवाय धुलीवंदनासाठी रासायनिक व कृत्रिम रंगांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे पर्यावरणाची हानी होऊन वायू, ध्वनी, मृदा व जल प्रदूषणात वाढ होते.

हे टाळण्यासाठी ‘एक गाव-एक होळी’, छोटी होळी किंवा टाकाऊ, अप्रदूषणकारी वस्तूंचा वापर करून होळी साजरी करावी, तसेच निसर्गात उपलब्ध असलेल्या पळस, गुलाब, जास्वंद, आवळा, हळद, केळी, बीट, पालक भाजी आदींच्या साहाय्याने नैसर्गिक रंग तयार करून धुलीवंदन साजरे केल्यास पर्यावरण व प्रत्येकाच्या आरोग्याचे संवर्धन होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय हरित सेनेचे मास्टर ट्रेनर वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे विज्ञान विषय शिक्षक पी. एल. शिंगणे होते. मुख्याध्यापक  एम. एस. लंबे यांनी पर्यावरणपूरक सणांचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय मनोगतात  शिंगणे यांनी नैसर्गिक रंगांच्या वापराची पर्यावरणासाठी असलेली गरज स्पष्ट केली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या पर्यावरण संवर्धन विभाग व राष्ट्रीय हरित सेनेने परिश्रम घेतले. प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक होळीची शपथ देण्यात आली. कार्यशाळेच्या निमित्ताने श्री. मेहेत्रे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे नैसर्गिक रंग तयार करून धुलीवंदनाचे प्रात्यक्षिक सादर केले.विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळीचा संकल्प करत कार्यक्रमाचा उत्स्फूर्त आनंद घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top