Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

meters of 38 customers seized :शून्य थकबाकीसाठी सामूहिक कारवाईला सुरुवात,शेलगावात ३८ ग्राहकांचे मीटर जप्त

meters of 38 customers seized : वीजबिल वसुलीवरच महावितरणचे अस्तित्व अवलंबून असल्याने थकबाकी शून्यावर आणण्यासाठी अकोला परिमंडळात वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. प्रतिसाद न देणाऱ्या भागांत सामूहिक कारवाई राबवून थकबाकीदार ग्राहकांची थेट मीटर काढून जप्ती करण्यात येत आहे. वीजबिल तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.मेहकर तालुक्यातील शेलगाव येथे थकबकीदार असलेल्या ३८ वीज ग्राहकांचे मीटर काढण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील थकबाकी १४४ कोटींवर पोहचली आहे.

meters of 38 customers seized
बुलढाणा जिल्ह्यात १४४ कोटींची थकबाकी, महावितरण थकबाकी वसुलीसाठी सरसावले

बुलढाणा : वीजबिल वसुलीवरच महावितरणचे अस्तित्व अवलंबून असल्याने थकबाकी शून्यावर आणण्यासाठी अकोला परिमंडळात वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. प्रतिसाद न देणाऱ्या भागांत सामूहिक कारवाई राबवून थकबाकीदार ग्राहकांची थेट मीटर काढून जप्ती करण्यात येत आहे. वीजबिल तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.मेहकर तालुक्यातील शेलगाव येथे थकबकीदार असलेल्या ३८ वीज ग्राहकांचे मीटर काढण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील थकबाकी १४४ कोटींवर पोहचली आहे.

शेगावात ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा–२०२६’चा उद्या शुभारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या उपस्थितीत व कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांच्या पुढाकाराने मेहकर विभागातील शेलगाव येथे विशेष सामूहिक कारवाई करण्यात आली. यावेळी थकबाकीदार ३८ वीज ग्राहकांचे मीटर काढण्यात आले. संपूर्ण थकबाकी, सुरक्षा ठेव आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

‘मिशन ९० दिवस’ला गती
‘मिशन ९० दिवस’ अंतर्गत आता केवळ ३६ दिवस शिल्लक आहेत. जानेवारी अखेरपर्यंतची थकबाकी आणि फेब्रुवारी महिन्याचे चालू बिल धरून एकूण २८० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र आतापर्यंत केवळ ८५ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे वसुली मोहिमेला अधिक वेग देण्यात आला आहे.

मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्यासह अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके, अजय शिंदे व प्रतीक्षा शंभरकर तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी यांना थेट वसुली मोहिमेत सहभागी करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
कारवाईत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल
वसुली मोहिमेत अडथळा आणणाऱ्या भागांत मोठ्या प्रमाणावर सामूहिक कारवाई राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान विरोध केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

जिल्हानिहाय थकबाकीचा आढावा
अकोला परिमंडळातील २८० कोटी रुपयांच्या थकबाकीत घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक व इतर ग्राहकांचा समावेश आहे.
• अकोला जिल्हा : ११५ कोटी ७४ लाख रुपये
• बुलढाणा जिल्हा : १४४ कोटी रुपये
• वाशिम जिल्हा : ५१ कोटी ६५ लाख रुपये
यापैकी अनुक्रमे ४० कोटी, ३२ कोटी व १३ कोटी रुपये अशी एकूण सुमारे ८० कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
थकबाकीदारांनी तातडीने वीजबिल भरून सहकार्य करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महावितरणने दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top