Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

 scholarship exam :शिष्यवृत्ती परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५ वीला १०,२४५ तर ८ वीला ६,१७२ विद्यार्थ्यांची उपस्थिती 

scholarship exam:  जिल्ह्यात २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत पेपर क्रमांक १ सुरळीत पार पडला. जिल्ह्यातील विविध ब्लॉकमधून इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने परीक्षा दिली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) रतनसिंग पवार यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली.

scholarship exam

संजय तायडे

अकोला : जिल्ह्यात २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत पेपर क्रमांक १ सुरळीत पार पडला. जिल्ह्यातील विविध ब्लॉकमधून इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने परीक्षा दिली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) रतनसिंग पवार यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली.

डोंगरगावातील गवंडी काम करणाऱ्या मजुराच्या मुलीची ITBP मध्ये निवड

इयत्ता पाचवीसाठी जिल्ह्यात एकूण १०,५८६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १०,२४५ विद्यार्थी उपस्थित राहिले, तर ३४१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. अकोला ब्लॉकमध्ये सर्वाधिक ३,८२२ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी ३,६८० उपस्थित, तर १४२ अनुपस्थित होते. बार्शीटाकळी येथे ९१९ पैकी ९०२ तर अकोटमध्ये १,४४८ पैकी १,४०४ विद्यार्थी ,

तेल्हारा येथे ९४१ पैकी ९२१, बाळापूरमध्ये १,१९५ पैकी १,१५९, पातूर येथे ९०६ पैकी , मूर्तिजापूरमध्ये १,०६४ पैकी १,०२८ तर अकोला मनपा क्षेत्रात २९१ पैकी २८२ विद्यार्थी उपस्थित होते.

इयत्ता आठवीमध्ये एकूण ६,४३१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ६,१७२ विद्यार्थी उपस्थित राहिले, तर २५९ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.अकोला ब्लॉकमध्ये २,६१५ पैकी २,४७६ विद्यार्थी उपस्थित, तर १३९ अनुपस्थित होते.

बार्शीटाकळी येथे ३८२ पैकी ३६५, अकोटमध्ये ६७८ पैकी ६६३, तेल्हारा येथे ५०९ पैकी ४९५, बाळापूरमध्ये ७५३ पैकी ७२९, पातूर येथे ६४३ पैकी ६२२ , मूर्तिजापूरमध्ये ६२३ पैकी ६०६ तर अकोला मनपा क्षेत्रात २२८ पैकी २१६ विद्यार्थी उपस्थित राहिले.

एकूणच, जिल्ह्यात ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक राहिली. सर्व परीक्षा केंद्रांवर योग्य नियोजन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top