Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Daughter of a mason :डोंगरगावातील गवंडी काम करणाऱ्या मजुराच्या मुलीची ITBP मध्ये निवड

Daughter of a mason : जिल्ह्यातील अकोला पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्राम डोंगरगाव येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील प्रज्ञा पुरणमल इंगळे हिची Indo-Tibetan Border Police (ITBP) या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नुकतीच निवड झाली असून तिचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रज्ञाने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. त्यामुळे ही घटना संपूर्ण गावासाठी ऐतिहासिक ठरली आहे.

Daughter of a mason

प्रज्ञा इंगळे हिने पहिल्याच प्रयत्नात मिळवली ‘वर्दी’; डोंगरगावातून ऐतिहासिक कामगिरी

संजय तायडे

अकोला : जिल्ह्यातील अकोला पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्राम डोंगरगाव येथील अत्यंत सामान्य कुटुंबातील प्रज्ञा पुरणमल इंगळे हिची Indo-Tibetan Border Police (ITBP) या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नुकतीच निवड झाली असून तिचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रज्ञाने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. त्यामुळे ही घटना संपूर्ण गावासाठी ऐतिहासिक ठरली आहे.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी अकोला या पेजला भेट द्या 

गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रज्ञा सैन्य भरतीसाठी सातत्याने प्रयत्न व अभ्यास करत होती. काही वेळा अपयश आले, तरी ‘फौजी’ होण्याचे तिचे स्वप्न तिने कधीही सोडले नाही. ती दररोज पहाटे पाच वाजता धावण्याचा सराव (रनिंग) करत होती. कोणत्याही परिस्थितीत सैन्यात भरती व्हायचे, हेच तिचे ध्येय होते. त्या दृष्टीने तिने शारीरिक व बौद्धिक तयारी सातत्याने सुरू ठेवली. अखेर तिची जिद्द आणि मेहनत फळाला आली असून तिचे सैन्य भरतीचे स्वप्न पूर्णत्वास गेले आहे.

‘प्रज्ञाच्या ITBP निवडीचा सार्थ अभिमान’

प्रज्ञाचे वडील गवंडी काम करून मजुरी करतात, तर आई मोलमजुरी करते. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, डोंगरगाव येथे झाले, तर पुढील शिक्षण शहरात झाले. डोंगरगावातून सैन्य दलात भरती होणारी ती पहिली महिला ठरली असून तिच्या या कामगिरीबद्दल गावासह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. “आम्हा सर्वांना प्रज्ञाच्या या निवडीचा सार्थ अभिमान आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

गावकऱ्यांनी प्रज्ञा इंगळे हिचा गावातील निर्मल ज्ञान बुद्ध विहार येथे सामूहिक त्रिशरण ग्रहण करून उत्साहात सत्कार केला.

“प्रज्ञाच्या ITBP दलातील निवडीने आम्ही खूप आनंदी झालो आहोत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्रज्ञाने हे यश सहजासहजी मिळवलेले नाही; तिने त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत. आज माझ्या मुलीच्या निवडीने ऊर अभिमानाने भरून आला आहे,” असे प्रज्ञाचे वडील पुरणमल महादेव इंगळे यांनी सांगितले.

“माझ्या आई-वडिलांची पहिल्यापासून इच्छा होती की, मी सैन्य दलात नोकरी करून देशसेवा करावी. त्यांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मला घडवण्यात गुरुजनांचा आणि ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा आहे. ITBP मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अविरत शारीरिक कसरत, परिश्रम आणि सातत्यपूर्ण सराव यामुळेच मला हे यश मिळाले,” अशी भावना प्रज्ञा पुरणमल इंगळे हिने व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top