Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

The glory of journalism in Satpura :सातपुड्यातील पत्रकारितेचा गौरव;‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्काराने संग्रामपूरचा मान उंचावला

The glory of journalism in Satpura : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचा प्रतिष्ठेचा ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला जाहीर झाला असून, २२ रोजी कर्जत (जि. रायगड) येथे आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. राज्यभरातील ३५५ तालुक्यांमधून निवड होत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवत संग्रामपूरने हा मान पटकावला.

The glory of journalism in Satpura

संग्रामपूर : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला जाहीर झाला असून २२ रोजी कर्जत (जि. रायगड) येथे आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. राज्यभरातील ३५५ तालुक्यांमधून निवड होत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवत संग्रामपूरने हा मान पटकावला.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी बुलढाणाया पेजला भेट द्या

या यशामुळे संग्रामपूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. समाजाभिमुख व विकासाभिमुख पत्रकारितेमुळे संग्रामपूर तालुक्याचा विशेष उल्लेख केला जातो. राजकारणाला केवळ टीकेपुरते न ठेवता विकासासाठी प्रेरक लिखाण करणारी पत्रकारिता हे येथील वैशिष्ट्य असल्याची दखल या पुरस्कारातून घेण्यात आली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही १९३९ पासून पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असलेली मातृसंस्था आहे. परिषदेच्या वतीने दरवर्षी उल्लेखनीय कार्यासाठी विविध आदर्श पुरस्कार दिले जातात. यंदाचा वसंतराव काणे ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूरला मिळाल्याने अमरावती महसूल विभागातून एकमेव बुलढाणा जिल्ह्याचा गौरव झाला.
कर्जत ( रायगड) येथील सोहळ्यात मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, वृत्तवाहिनी प्रतिनिधी मंदार फणसे, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, प्रदेश प्रतिनिधी चंद्रकांत बर्डे, जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह राजपूत, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष अभय आपटे, राहुल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य पातळीवरील हा पुरस्कार सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ अशा स्वरूपात प्रदान करण्यात आला.

संघाची एकजूट ठरली यशाची गुरुकिल्ली
पुरस्कार स्वीकारण्यासाठी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची संपूर्ण टीम उपस्थित होती. अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे, जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष अझहर अली, ज्येष्ठ मार्गदर्शक रामेश्वर गायकी, केंद्रीय जिल्हा कार्यकारी सदस्य श्याम देशमुख, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र धर्माधिकारी, सचिव विवेक राऊत, उपाध्यक्ष शेख अब्दुल, उपाध्यक्ष कासम सुरत्ने, कोषाध्यक्ष वासुदेव दामधर , तालुका संघटक श्याम इंगळे, मोहन सोनोने, विभागीय संघटक डॉ. संतोष लांडे, जिल्हा समिती सदस्य आकाश पालीवाल, सागर कापसे,हल्लाकृती समिती सदस्य स्वप्निल देशमुख, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष गोपाल धर्माळ, उपाध्यक्ष भगवान पाखरे, ज्ञानेश्वर अतकारे, विठ्ठल निंबोळकार, नंदू पाटील खानझोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण पत्रकारितेची राज्यस्तरीय दखल
संग्रामपूर हा आदिवासी बहुल व मागास तालुका म्हणून ओळखला जात असला, तरी येथील पत्रकारितेने शहरी तालुक्यांनाही मागे टाकत वेगळेपण सिद्ध केले आहे. सामाजिक प्रश्न, जनहिताचे मुद्दे आणि ग्रामीण भागातील समस्यांना सातत्याने वाचा फोडत केलेल्या कार्याची ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे.

डिजिटल युगात स्पर्धा वाढली असली तरी ग्राउंड रिपोर्टिंग व स्थानिक प्रश्नांवरील भक्कम मांडणीमुळे ग्रामीण पत्रकारिता आजही प्रभावी ठरत असल्याचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी सांगितले. परिषदेच्या अकरा अध्यक्षांच्या भाषणांचा संग्रह प्रकाशित करण्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

पुरस्कार म्हणजे जबाबदारी’

“पुरस्कार हा केवळ सन्मान नसून जबाबदारी आहे. संग्रामपूर तालुका पत्रकार संघाने ही जबाबदारी जपत समाजाभिमुख पत्रकारिता अधिक बळकट करावी,” अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष रणजीत राजपूत यांनी व्यक्त केली. विजेत्या संघानेही ही अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचा आज राज्यस्तरीय सन्मान

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top