Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Eicher truck and bike collide :आयशर ट्रक व दुचाकीची धडक; दुचाकी चालक गंभीर जखमी

Eicher truck and bike collide :  भरधाव आयशर ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना अकोला–बाळापूर महामार्गावर व्याळा नजीक  २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली.

Eicher truck and bike collide
अकोला–बाळापूर महामार्गावरील व्याळा नजीकची घटना

ज़ाकिर अहमद

बाळापूर :    भरधाव आयशर ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना अकोला–बाळापूर महामार्गावर व्याळा नजीक  २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक (क्र. एमएच ४८ सीबी ४८२२) अकोला येथून बाळापूरकडे जात असताना, व्याळा परिसरात बाळापूरहून अकोल्याकडे येणाऱ्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीला धडक दिली . या अपघातात दुचाकी चालक सलीमोद्दीन हसीनोदिन (वय ४०, रा. भागवत वाडी, डाबकी रोड, अकोला) गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

या प्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशन येथे अक्रम खान बिस्मिल्ला खान (रा. सिंधी कॅम्प, अकोला) यांनी फिर्याद दाखल केली आहे. आयशर ट्रक चालक चंदनलाल यादव (रा. अंधेरी ईस्ट, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याळा बिटचे कर्मचारी अविनाश आळे, आकाश राठोड आणि संदीप पवार करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top