Mahabreaking

[breaking_news]

Dongaon spontaneous shutdown :चिखला घटनेच्या निषेधार्थ डोणगावात कडकडीत बंद; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

Dongaon spontaneous shutdown : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे शिवस्मारकाच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात महिलांवर अमानुष मारहाण झाल्याचा आरोप असून, या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ डोणगाव शहर २२ फेब्रुवारी रोजी स्वयंस्फूर्तपणे कडकडीत बंद ठेवण्यात आले.

Dongaon spontaneous shutdown

डोणगाव :  बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे शिवस्मारकाच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात महिलांवर अमानुष मारहाण झाल्याचा आरोप असून, या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ डोणगाव शहर २२ फेब्रुवारी रोजी स्वयंस्फूर्तपणे कडकडीत बंद ठेवण्यात आले.

२० फेब्रुवारी २०२६ रोजी चिखला येथे शिवस्मारकावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत मराठा समाजातील शिवकन्या संजीवनीताई वाघ यांच्यासह इतर महिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. महिलांच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचेही सांगितले जात असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

घटनेचा निषेध करत संबंधित मुख्य आरोपी व सहआरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल शिवप्रेमी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत व समाजात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

दरम्यान, २२ फेब्रुवारी रोजी डोणगाव शहर बंद ठेवण्याचा निर्णय सकल शिवप्रेमी समाजाने घेतला होता. त्यानुसार सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध नोंदविला. नागरिकांनीही बंदला सहकार्य केले. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top