Mahabreaking

[breaking_news]

Sangrampur Taluka Journalists :संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचा आज राज्यस्तरीय सन्मान

Sangrampur Taluka Journalists : तालुक्याच्या पत्रकारितेचा अभिमान उंचावणारी आनंदाची बातमी समोर आली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसंतराव काणे ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार यंदा संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला जाहीर झाला आहे. अमरावती महसूल विभागातून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची निवड झाल्याची अधिकृत घोषणा मुंबई येथील मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी केली.

Sangrampur Taluka Journalists
वसंतराव काणे ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कारासाठी कर्जत येथे भव्य सोहळा

संग्रामपूर : तालुक्याच्या पत्रकारितेचा अभिमान उंचावणारी आनंदाची बातमी समोर आली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसंतराव काणे ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार यंदा संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला जाहीर झाला आहे. अमरावती महसूल विभागातून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची निवड झाल्याची अधिकृत घोषणा मुंबई येथील मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी केली.

राज्य पातळीवरील हा गौरवशाली पुरस्कार सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ अशा स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे. दिनांक २२ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील रॉयल गार्डन येथे भव्य राज्यस्तरीय सोहळ्यात पुरस्कार वितरण होणार आहे.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची संपूर्ण टीम उत्साहात रवाना झाली आहे. अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे, जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष अझहर अली, ज्येष्ठ मार्गदर्शक रामेश्वर गायकी, हल्लाकृती समिती सदस्य सागर, विभागीय संघटक डॉ. संतोष लांडे, जिल्हा समिती सदस्य आकाश पालीवाल, हल्लाकृती समिती सदस्य स्वप्निल देशमुख, सागर कापसे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्याम देशमुख, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र धर्माधिकारी, सचिव विवेक राऊत, उपाध्यक्ष अब्दुलभाई, उपाध्यक्ष कासम सुरत्ने, कोषाध्यक्ष वासुदेव दामोधर, तालुका संघटक श्याम इंगळे, मोहन सोनोने, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष गोपाल धर्मळ, उपाध्यक्ष भगवान पाखरे, ज्ञानेश्वर आतकरे, विठ्ठल निंबोळकार, नंदू पाटील खानझोड आदी पदाधिकारी २२ फेब्रुवारी रोजी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रंजीतभाई राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या पथकाला बुलढाणा येथून उत्साहात रवाना करत शुभेच्छा दिल्या. संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारितेने सामाजिक प्रश्न, जनहिताचे मुद्दे आणि ग्रामीण भागातील समस्यांना सातत्याने वाचा फोडत केलेल्या कार्याची ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे. या सन्मानामुळे तालुक्यातील पत्रकारितेच्या कार्याला नवी ऊर्जा व व्यापक दिशा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा या पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top