Mahabreaking

🔴 BREAKING
Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’ Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’

district’s average rice yield is 52 paise : ढगफुटी,पुरात पिके वाहून गेल्यानंतरही जिल्ह्याची सरासरी आणेवारी ५२ पैसे 

district’s average rice yield is 52 paise : जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी, पूर आदीमुळे खरीप हंगामातील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना प्रशासनाने १ ऑक्टाेबर राेजी जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्याची सरासरी ही ५२ पैसे काढली आहे. याचा अर्थ खरीत हंगामात जिल्ह्यातील पिकांची स्थिती चांगली आहे असा हाेताे. त्यामुळे, येणाऱ्या काळात जिल्ह्याला मदत मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

district's average

तब्बल ८३२ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त तर ५८८ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी
बुलढाणा : जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी, ढगफुटी, पूर आदीमुळे खरीप हंगामातील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असताना प्रशासनाने १ ऑक्टाेबर राेजी जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्याची सरासरी ही ५२ पैसे काढली आहे. याचा अर्थ खरीत हंगामात जिल्ह्यातील पिकांची स्थिती चांगली आहे असा हाेताे. त्यामुळे, येणाऱ्या काळात जिल्ह्याला मदत मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आणेवारीचा पहिला टप्पा असून अंतिम आणेवारीत यामध्ये बदल हाेण्याची शक्यता आहे. पण आता पाउस किंवा इतर संकटे नसताना त्यामध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील तब्बल ८३२ गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त काढण्यात आली आहे.
यंदाच्या सन २०२५-२६ च्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावातील नजर अंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यानुसार सरासरी नजर अंदाज पैसेवारी ५२ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १४२० गावे असून ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ५८८ आहे. तर ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ही ८३२ आहे.
जिल्हा प्रशासनाने ५० पैसेपेक्षा जास्त व कमी पैसेवारी असलेल्या तालुकानिहाय गावांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या बुलढाणा तालुक्यातील ९८ गावाची सरासरी पैसेवारी ५४ पैसे, देऊळगाव राजा तालुक्यात ६४ गावाची सरासरी पैसेवारी ५२ पैसे, सिंदखेड राजा तालुक्यात ११४ गावाची सरासरी पैसेवारी ५५ पैसे, मोताळा तालुक्यात १२० गावाची सरासरी पैसेवारी ५६ पैसे, नांदुरा तालुक्यात ११२ गावाची सरासरी पैसेवारी ५७ पैसे, खामगांव तालुक्यात १४६ गावाची सरासरी पैसेवारी ५९ पैसे, शेगांव तालुक्यात ७३ गावाची सरासरी पैसेवारी ५३ पैसे, संग्रामपुर तालुक्यात १०५ गावाची ५७ पैसे इतकी सरासरी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या चिखली तालुक्यातील १४४ गावाची सरासरी पैसेवारी ४९ पैसे, मेहकर तालुक्यात १६१ गावाची सरासरी पैसेवारी ४६ पैसे, लोणार तालुक्यात ९१ गावाची सरासरी पैसेवारी ४५ पैसे, मलकापूर तालुक्यात ७३ गावाची सरासरी पैसेवारी ४६ पैसे, जळगाव जामोद तालुक्यात ११९ गावाची ४९ पैसे इतकी सरासरी पैसेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top