Mahabreaking

[breaking_news]

Shiv Jayanti :ब्राह्मण चिकना येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Shiv Jayanti : ब्राह्मण चिकना येथे सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अभय दादा चव्हाण यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सरपंच संदीप गायकवाड यांनी अभय दादा चव्हाण यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Shiv Jayanti

ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; गीतांच्या कार्यक्रमाने ग्रामस्थ मंत्रमुग्ध

रमेश खंडागळे 

बीबी : ब्राह्मण चिकना येथे सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अभय दादा चव्हाण यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सरपंच संदीप गायकवाड यांनी अभय दादा चव्हाण यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यानंतर गावातून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवराय’च्या जयघोषात संपूर्ण ब्राह्मण चिकना गाव दुमदुमून गेले होते. या मिरवणुकीत सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रात्री थोर पुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित गीतांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. अकोला येथील कलाकारांनी सादर केलेल्या देशभक्तीपर आणि प्रेरणादायी गीतांनी उपस्थित ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर सौदर (सावरगाव तेली), एकनाथ मामा बुरुकुल (चिखला), असलम सेठ (बीबी), जाकीर भाई, विठ्ठल वायाळ, निलेश चव्हाण, रवी बोडके, संभाजी मुद्गुल, शाहीर शत्रुघन चव्हाण व संजय सौदर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच महिला, पुरुष, युवक-युवती व लहान बालकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली. आसपासच्या गावांतील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमस्थळी आयोजकांनी केलेली बंदोबस्त व्यवस्था चोख होती. याबद्दल ग्रामस्थांकडून आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे.या कार्यक्रमाचे आयोजन राजमुद्रा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ, ब्राह्मण चिकना यांच्या वतीने करण्यात आले.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा या पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top