Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

four injured :गुंज येथे डीजेच्या आवाजावरून दोन गट आमनेसामने; काठ्यांनी मारहाण, चार जण जखमी

four injured : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुंज गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत चौघेजण जखमी झाले असून दोन्ही गटांतील एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर तसेच माजी सभापती सुरेश तुपकर यांचा समावेश आहे.

four injured

आजी-माजी सभापतींसह दोन्ही गटाच्या  १९ जणांवर गुन्हा दाखल

साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुंज गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत चौघेजण जखमी झाले असून दोन्ही गटांतील एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर तसेच माजी सभापती सुरेश तुपकर यांचा समावेश आहे.

गुंज येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘जानता राजा’ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत होती. गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत युवक डीजेसह सहभागी झाले होते. मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर यांच्या घरासमोर आली असता, घरात अँजिओप्लास्टी झालेला रुग्ण असल्याने येथे डीजे न वाजवता पुढे जाऊन वाजवावा, अशी विनंती त्यांनी युवकांना केली.

यावरून वाद निर्माण झाला. काही युवकांनी पूर्वीच्या राजकीय वादाचा उल्लेख करत अनिल तुपकर, त्यांचे वडील मुरहरी तुपकर, आई तसेच भावास मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत मुरहरी तुपकर यांना गंभीर दुखापत झाली, तर त्यांच्या आईलाही मार लागून त्या जखमी झाल्या. मुरहरी तुपकर हे माजी सैनिक असून त्यांनी १९६२ च्या युद्धात सहभाग घेतल्याची माहिती आहे.

अनिल तुपकर यांच्या तक्रारीवरून अमोल सुरेश तुपकर, सुरेश माधवराव तुपकर, ऋतिक गजानन तुपकर, शाम सुरेश तुपकर, गजानन केशव तुपकर, कार्तिक अनंता तुपकर, समर्थ गणेश तुपकर, चेतन गणेश तुपकर, अनंता केशव तुपकर, कडूबा मनोहर तुपकर, पवन परसराम तायडे, अक्षय पप्पू तुपकर, प्रथमेश रमेश तुपकर, रमेश माधवराव तुपकर आदी १४ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११८(२), १९१(२), १९१(३), १२५(ब), ३३३, ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, सुरेश माधवराव तुपकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, शिवजयंती मिरवणूक सुरू असताना ऋतिक तुपकर यास त्यांच्या घराजवळ अडवून अनिल तुपकर मारहाण करीत होते. तसेच मुरहरी तुपकर हातात काठी घेऊन समर्थ तुपकर यास मारहाण करत होते. काठी अडविताना ती काटेरी असल्याने सुरेश तुपकर यांच्या हाताला व दाढीला दुखापत झाली. अशोक तुपकर हेही काठी घेऊन मारहाण करत असल्याचा आरोप करण्यात आला असून त्यात अक्षय तुपकर जखमी झाल्याचे नमूद आहे.

या फिर्यादीवरून अनिल मुरहरी तुपकर, मुरहरी बाजीराव तुपकर, अशोक मुरहरी तुपकर, विठ्ठल जनार्दन तुपकर आणि योगेश रामचंद्र तुपकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १९१(२), १९१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, दोन वर्षांपूर्वी नाली बांधकामाच्या कारणावरून याच ठिकाणी दोन गटांत वाद झाल्याचीही माहिती समोर आली आहे. घटनेचा पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करत आहेत.

जिल्ह्यातील इतर बातम्यांसाठी बुलढाणा या पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top