Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Dongaon Primary Health Center :डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्कार

Dongaon Primary Health Center : राज्य महामार्गावर वसलेल्या डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला यावर्षीचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. HMIS (Health Management Information System) माहितीनुसार उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या केंद्रांमधून प्रत्येक जिल्ह्यातून एका प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केली जाते. यंदा बुलढाणा जिल्ह्यातून डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे.

Dongaon Primary Health Center

डोणगाव : राज्य महामार्गावर वसलेल्या डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला यावर्षीचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. HMIS (Health Management Information System) माहितीनुसार उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या केंद्रांमधून प्रत्येक जिल्ह्यातून एका प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केली जाते. यंदा बुलढाणा जिल्ह्यातून डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे.

डोणगाव हे राज्य महामार्गावरील महत्त्वाचे गाव असून या केंद्राशी सुमारे २७ खेडी संलग्न आहेत. एवढेच नव्हे तर परजिल्ह्यातील रुग्णही दररोज तपासणीसाठी येथे येत असतात. विशेष म्हणजे, या केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे प्रमाण लक्षणीय असून सेवा कार्यात सातत्य व गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. या उल्लेखनीय कामगिरीमुळे केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांची ‘महाआरोग्य सन्मान’ पुरस्कारासाठीही निवड झाली आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र डॉ. सरीता हजारे, सहसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा यांना पाठविले आहे.

या निवडीबद्दल डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड व सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, ग्रामीण भागात उत्कृष्ट व प्रभावी आरोग्य सेवा देण्याच्या त्यांच्या कार्याची ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे.

बारावी कॉपी प्रकरण उघड करणाऱ्या भरारी पथकाचा शासकीय सन्मान करा : माजी मंत्री सुबोध सावजी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top