Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Shiv Jayanti :नवयुग विद्यालयात शिवजयंती उत्साहात; शिवरायांच्या पर्यावरणदृष्टिकोनाचा विद्यार्थ्यांना संदेश

Shiv Jayanti : येथील नवयुग विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण टाले होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संत तुकाराम शिक्षण संस्थेचे संचालक गणेशराव वाघ उपस्थित होते.

Shiv Jayanti

वाडी अदमपूर : येथील नवयुग विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण टाले सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संत तुकाराम शिक्षण संस्थेचे संचालक गणेशराव वाघ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेशराव वाघ यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हरित सेनेचे प्रभारी शिक्षक हर्षवर्धन मोरे यांनी शिवाजी महाराजांच्या पर्यावरणप्रेमावर प्रकाश टाकला. महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात आरमारासाठी लागणारे लाकूड परदेशातून विकत आणावे, प्रजेची झाडे तोडू नयेत, तसेच जीर्ण झाडे मालकाची परवानगी घेऊन योग्य मोबदला देऊनच घ्यावीत, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. यावरून शिवरायांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व ओळखले होते, असे त्यांनी नमूद केले.

यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दिपाली पांडे व  नंदिनी हातेकर यांनी केले, तर प्रास्ताविक बलवंत गावंडे सर यांनी मांडले. संचालिका सौ. स्वातीताई वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लेखन पॅड व पेनचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास सीमाताई वैराळे मॅडम, मंगेश माकोडे सर, संजय लव्हारे सर, अनंत तळोकार सर, संजय देशमुख सर यांची उपस्थिती होती. संजय दाते, रविंद्र गादे व ज्ञानेश्वर डांगे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी अकोला या पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top