Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Blackbuck dies :अज्ञात वाहनाची धडक; पुलावरून पडून काळवीटाचा मृत्यू

Blackbuck dies :पातुर तालुक्यातील आलेगाव वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील वाडेगाव–पातुर मार्गावरील निर्गुणा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.

Blackbuck dies

राहुल सोनोने 

दिग्रस बुद्रुक: पातुर तालुक्यातील आलेगाव वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील वाडेगाव–पातुर मार्गावरील निर्गुणा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणा येथील गोपाल सोनोने, विशाल उजाडे, दत्ता उजाडे व रोहित तेलगोटे यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तत्काळ आलेगाव विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून मृत काळवीटाबाबत माहिती दिली. माहिती मिळताच आलेगावचे वनपाल सय्यद मुक्तार, वनमजूर मधुकर राठोड, प्रशांत डोबळे, अजय मेसरे व शाम करपे हे घटनास्थळी दाखल झाले. मृत अवस्थेतील काळवीट उचलून मालेगाव येथे नेण्यात आले असून पंचनामा करून त्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, मुख्य रस्ता ओलांडत असलेल्या तीन हरणांपैकी एका काळवीटाला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडकेमुळे काळवीट पुलावरून खाली पाण्यात पडून जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा पुढील तपास आलेगाव वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top