Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Kanzara team :थरारक अंतिम सामन्यात कंझारा संघ विजेता; मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

Kanzara team : सृष्टी ॲग्रोटेक जानेफळच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या जानेफळ चषक-२०२६ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत थरारक वातावरणात पार पडला. अंतिम सामन्यात दमदार खेळ करत के.जी.एन. कंझारा संघाने विजेतेपद पटकावले.

Kanzara team

रुपाली अमर राऊत

जानेफळ : सृष्टी ॲग्रोटेक जानेफळच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या जानेफळ चषक-२०२६ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत थरारक वातावरणात पार पडला. अंतिम सामन्यात दमदार खेळ करत के.जी.एन. कंझारा संघाने विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे आयोजन तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा हावरे, सामाजिक कार्यकर्ते संदीप दांडगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर मुरडकर आणि क्रिकेटप्रेमी इरफान मिर्झा यांनी केले होते. दहा दिवस चाललेल्या या स्पर्धेत २४ ग्रामीण व ८ शहरी संघांनी सहभाग नोंदविला.

उपांत्य फेरीत राजे छत्रपती बुलढाणा संघाने ग्रीन स्टार अमडापूरवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात सहारा चांडोळचा पराभव करून के.जी.एन. कंझारा संघ अंतिम सामन्यात पोहोचला. आठ षटकांच्या अंतिम सामन्यात कंझारा संघाने केलेल्या १०० धावांचा पाठलाग छत्रपती बुलढाणा संघाला करता आला नाही आणि कंझारा संघ विजेता ठरला.

प्रथम पारितोषिक म्हणून सामाजिक कार्यकर्ते मोहन धोटे पाटील यांच्या वतीने १ लाख रुपयांचे बक्षीस कंझारा संघाला देण्यात आले. उपविजेत्या छत्रपती बुलढाणा संघाला मोहसीन शेख व माजी सरपंच अनिल कोल्हे यांच्या वतीने ६१ हजार रुपये देण्यात आले. तृतीय क्रमांक सहारा चांडोळ संघाने (३१ हजार रुपये) मिळविला, तर चतुर्थ क्रमांक ग्रीन स्टार-११ अमडापूर संघाला मिळाला.

बक्षीस वितरण सोहळा माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, सामाजिक कार्यकर्ते मोहनभाऊ धोटे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेतील सामनावीर, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज आणि मालिकावीर खेळाडूंना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्ते, पंच, समालोचक आणि सहकार्य करणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात आला. नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने स्पर्धा पार पडल्याबद्दल आयोजकांचे खेळाडू व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. इरफान मिर्झा यांनी सहभागी सर्व संघ व खेळाडूंचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top