Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Prahlad Maharaj :साखरखेर्ड्यात प्रल्हाद महाराज जन्मोत्सवाची भक्तीमय सांगता; रथोत्सव मिरवणुकीत भाविकांची गर्दी

Prahlad Maharaj : येथील परमपूज्य प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता आज रथोत्सव मिरवणूक आणि महाप्रसाद वितरणाने भक्तीमय वातावरणात झाली.

  Prahlad Maharaj

  आठ दिवसांच्या सोहळ्यानंतर महाप्रसाद वितरण; भजनी दिंड्यांनी रंगली नगरी

  साखरखेर्डा :  येथील परमपूज्य प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता आज रथोत्सव मिरवणूक आणि महाप्रसाद वितरणाने भक्तीमय वातावरणात झाली.

१८ फेब्रुवारी रोजी सकाळी संस्थानातून रथोत्सव मिरवणुकीला प्रारंभ झाला. गुजरी चौक मार्गे श्रीराम मंदिर तसेच श्रींच्या निवासस्थानी मिरवणूक पोहोचून पुन्हा मंदिरात परतली. यावेळी महिलांनी सडामार्जन करून रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. ठिकठिकाणी महिला व पुरुषांनी भक्तिभावाने श्रींची पूजा करून दर्शनाचा लाभ घेतला. मिरवणुकीत शेकडो भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या.

ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल यांनी चहा-पाण्याची व्यवस्था केली होती, तर पालखी मिरवणुकीत संस्थानचे उपाध्यक्ष उल्हास देशपांडे यांनी खांदेकरी म्हणून सहभाग नोंदविला. श्रीरामाच्या जयघोषात महिलांनी पावली खेळत मिरवणुकीत रंगत आणली.

१७ फेब्रुवारी रोजी रामदास पंत आचार्य यांनी श्रींच्या जीवनचरित्रावर प्रवचन सेवा अर्पण केली. त्यानंतर गुलाल उधळीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यास महाराष्ट्रभरातून हजारो भाविक उपस्थित होते.आठ दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात प्रवचनकार पंकज किंबहुने, वसू भारद्वाज, रामदास पंत आचार्य, मुकुंदराव मुळे तसेच कीर्तनकार संदीप बुवा मांडके, स.भ. व्यास अंबिकाताई लिंबेकर, प्रणव बुवा जोशी यांनी सेवा अर्पण केली. गायन सेवेत भूषण महाजन, घननिळ पाटील, आत्माराम दुतोंडे, श्रीपाद निंबेकर, कृष्णेंद्र वाडीकर आणि नागेश अडगावकर सहभागी झाले.दासनवमी महोत्सवानिमित्त आठ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top