Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Sanjay Raimulkar :जानेफळ येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापनेची मागणी; संजय रायमुलकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

Sanjay Raimulkar : राज्य शासनाने विविध ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर तहसील कार्यालये स्थापन करण्याबाबत परिपत्रक जारी केले असून, मेहकर तालुक्यात डोणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन होणार आहे. मात्र अतिदुर्गम भागातील गावांच्या सोयीसाठी जानेफळ येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री व संबंधितांकडे पत्राद्वारे केली आहे.

Sanjay Raimulkar

मेहकर : राज्य शासनाने विविध ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर तहसील कार्यालये स्थापन करण्याबाबत परिपत्रक जारी केले असून, मेहकर तालुक्यात डोणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन होणार आहे. मात्र अतिदुर्गम भागातील गावांच्या सोयीसाठी जानेफळ येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री व संबंधितांकडे पत्राद्वारे केली आहे.

सध्याच्या तहसील कार्यालयावरील अतिरिक्त ताण कमी व्हावा तसेच दुर्गम भागातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामे कमी अंतरात पूर्ण करता यावीत, यासाठी राज्य शासनाने अतिरिक्त जिल्हाधिकारी व अप्पर तहसील कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावर अंतिम कार्यवाही अद्याप प्रलंबित आहे.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा, नायगाव देशमुख, मोहना, मांडवा, पारखेड, वडाळी आदी सुमारे ४५ गावे तहसील मुख्यालय मेहकरपासून ४० ते ६० किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना महसूल कामांसाठी वारंवार मेहकर येथे जावे लागते. हा त्रास कमी व्हावा तसेच श्रम व खर्चाची बचत व्हावी, यासाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जानेफळ येथे अप्पर तहसील कार्यालयाची तातडीने स्थापना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून या विषयाला प्राधान्य देण्याची विनंतीही संजय रायमुलकर यांनी केली आहे.

दुर्गम आदिवासी भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व इतर घटकांच्या सोयीसाठी जानेफळ येथे अप्पर तहसील कार्यालयाची स्थापना होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा ला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top