Mahabreaking

[breaking_news]

Chatari Rural Hospital :चतारी ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी ७४ लाख मंजूर; रुग्णांना दिलासा

Chatari Rural Hospital :  चतारी (ता. पातूर) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जीर्ण व धोकादायक इमारतीबाबत ग्रामस्थ आणि रुग्णांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. सामाजिक कार्यकर्ते विकास गजानन किर्तने यांनी २० जानेवारी २०२६ रोजी प्रधान सचिवांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत रुग्णालयाला नवसंजीवनी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Chatari Rural Hospital

पातूर : चतारी (ता. पातूर) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जीर्ण व धोकादायक इमारतीबाबत ग्रामस्थ आणि रुग्णांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. सामाजिक कार्यकर्ते विकास गजानन किर्तने यांनी २० जानेवारी २०२६ रोजी प्रधान सचिवांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत रुग्णालयाला नवसंजीवनी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने (सार्वजनिक बांधकाम विभाग) इमारतीच्या दुरुस्तीचा अंदाज सादर केल्यानंतर ७४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी दुरुस्ती कामांसाठी मंजूर करण्यात आला असून, संबंधित अंदाजपत्रक प्रशासकीय मंजुरी व निधी मागणीसाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा नियोजन समिती यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

याशिवाय, अकोला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांशी चर्चा करून संपूर्ण ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन इमारतीचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. हे प्रस्तावित अंदाजपत्रक राज्य सरकारकडे मंजुरीसाठी लवकरच सादर करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

चतारी ग्रामीण रुग्णालयातून पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अनेक गावांतील रुग्ण उपचार घेतात. इमारतीच्या जीर्ण अवस्थेमुळे रुग्ण व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. किर्तने यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने उचललेल्या या सकारात्मक पावलांमुळे ग्रामीण आरोग्यसेवेला चालना मिळून रुग्णसेवेची गुणवत्ता सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top