Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

BJP aggressive :हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरुध्द भाजप आक्रमक, बुलढाणासह जिल्हाभरात आंदोलन 

BJP aggressive :  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या कथित वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून भाजपने बुलढाणा शहरात तीव्र निषेध आंदोलन छेडले. १५ फेब्रुवारी रोजी जयस्तंभ चौकातील गांधी भवन परिसरात सपकाळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला-जोड़े मारून दहन करण्यात आले तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

BJP aggressive

बुलढाणा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या कथित वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून भाजपने बुलढाणा शहरात तीव्र निषेध आंदोलन छेडले. १५ फेब्रुवारी रोजी जयस्तंभ चौकातील गांधी भवन परिसरात सपकाळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला-जोड़े मारून दहन करण्यात आले तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हे आंदोलन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडले. संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व राष्ट्रप्रेरणा असून त्यांच्या कार्याची कोणाशीही तुलना करणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान करणारी बाब आहे. सपकाळ यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनीही काँग्रेसवर सडकून टीका करत निषेध व्यक्त केला.या आंदोलनात भाजपा जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, दीपक वारे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे, जिल्हा उपाध्यक्ष विलास मानवतकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. तेजराव नरवाडे, जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल, मंडळ अध्यक्ष सतीश भाकरे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उषाताई पवार, महिला शहराध्यक्ष वर्षाताई पाथरकर, शोभाताई ढवळे, शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक संदीप नरोटे, रंजना कायस्थ, वेदाताई कथने, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष दिगंबर अंभोरे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन पवार, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे, बाजार समिती संचालक सुनील देशमुख, राजेंद्र खरात, अण्णा देवकत्ती, तुषार पडोळ, अरविंद जाधव, दशर्थसिंग राजपूत, संजय जुंबड, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर उबरहंडे, पवन बगाडे, संजय मोटे, मिलिंद चिंचोळकर, केशव बेंडवाल, मोहन निमरोट, नितीन दासार, प्रदीप सोनटक्के, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश मुठ्ठे, राजेंद्र पवार, सुभाष कदम, तुकाराम राठोड, सचिन टेंभिकर, मंडळ अध्यक्ष अनिल जाधव, सारंग एकडेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी सहभागी झाले होते.

मोताळ्यातही निषेधाची तीव्रता
सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोताळा तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनीही बसस्थानक परिसरात आंदोलन केले. यावेळी प्रतिमेला चपलांनी तुडवत “मुर्दाबाद”च्या घोषणा देण्यात आल्या, तर “जय भवानी, जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले असून पुढील काळातही निषेध सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top