Mahabreaking

[breaking_news]

two tippers and six bags of sand seized :रेती माफियांविरुध्द धडक कारवाई सुरूच ;दोन टिप्परसह सहा ब्रास रेती जप्त

two tippers and six bags of sand seized : तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत दोन टिप्परसह सहा ब्रास रेती जप्त केली आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून रेती तस्करांवर प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

two tippers and six bags of sand seized
महसूल विभागाच्या पथकाची नारायणखेड परिसरात कारवाई

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत दोन टिप्परसह सहा ब्रास रेती जप्त केली आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून रेती तस्करांवर प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्र तसेच धरणालगतचा नारायणखेड परिसर हा जिल्ह्यातील मोठा रेती घाट मानला जातो. या भागात अवैध उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व त्यांच्या पथकाने १३ तारखेला पहाटे अडीच वाजता छापा टाकला.
या कारवाईत एमएच-२८-बीबी-७४८९ क्रमांकाचा टिप्पर चालक प्रवीण डोईफोडे व मालक मनोज चेके (रा. तांदूळवाडी, ता. सिंदखेड राजा) यांच्याकडून तीन ब्रास रेतीसह लाखो रुपयांचा टिप्पर जप्त करण्यात आला. त्यानंतर दुसरा एमएच-२८-बीबी-०५५६ क्रमांकाचा टिप्पर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महसूल पथकाने पकडला. या वाहनातूनही तीन ब्रास रेती आढळून आली असून चालक अनिकेत दौंड व मालक राहुल धनवटे असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दोन्ही टिप्परमधील एकूण सहा ब्रास रेती आणि लाखो रुपयांची वाहने जप्त करून देऊळगाव राजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर बुरुकुल, आकाश खरात, तेजस शेटे, महसूल सेवक कविता शिरसाट, शिपाई संतोष भोपळे व ताठे आदींचा सहभाग होता. महसूल विभागाकडून सातत्याने कारवाई होत असली तरी रेती तस्करी थांबण्याचे चित्र दिसत नाही. प्रशासनाने मोहीम अधिक कडक केल्यास अवैध उत्खननावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top