Mahabreaking

[breaking_news]

Upper Tehsil Office in Dongaon :डोणगावात अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी; माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांना यश

Upper Tehsil Office in Dongaon :  मेहकर तहसील कार्यालयावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी डोणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन व्हावे, यासाठी माजी आमदार संजय रायमुलकर यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रदीर्घ प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून डोणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Upper Tehsil Office in Dongaon

मेहकर : मेहकर तहसील कार्यालयावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी डोणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन व्हावे, यासाठी माजी आमदार संजय रायमुलकर यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रदीर्घ प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून डोणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयावरील वाढता ताण लक्षात घेऊन राज्यात ११ ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निर्मितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी विविध ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबत शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने संजय रायमुलकर यांनी डोणगाव येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याची मागणी शासनाकडे सादर केली होती. प्रदीर्घ विचारांती शासनाने आता अप्पर तहसील कार्यालयांच्या निर्मितीचा निर्णय घेतला आहे.

डोणगाव परिसरातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी दूरवर मेहकर तहसील कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा खर्च होत होता. ही अडचण लक्षात घेऊन रायमुलकर यांनी महसूल व वन विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करत सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी डोणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन होण्यास मंजुरी मिळाली आहे.

सदर कार्यालय प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून डोणगावचे प्रशासकीय महत्त्वही वाढणार आहे. तहसील कार्यालयाशी संबंधित अनेक कामे स्थानिक पातळीवरच पूर्ण होणार असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top