Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Inauguration  :लोकवर्गणीतून उभारलेल्या रंगमंचाचे उद्घाटन; डोणगाव जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

Inauguration  : जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, डोणगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सद्दाम शाह यांनी भूषविले.

Inauguration

डोणगाव : जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, डोणगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सद्दाम शाह यांनी भूषविले.

प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी, ज्येष्ठ नेते नाझिमभाई कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य जोईप खान, दिलुभाई ठेकेदार, पत्रकार बांधव तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमास असंख्य पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली असून, महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या नव्या रंगमंचाच्या उद्घाटनाने करण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, सामाजिक व शैक्षणिक विषयांवरील बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. देशभक्तीपर गीते, नाटिका, समूह नृत्य आणि प्रबोधनात्मक सादरीकरणांमुळे संपूर्ण परिसर उत्साहमय झाला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रब्बानी यांनी करत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत पालकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन अनवर अहमद अन्सार अहमद यांनी प्रभावीपणे केले. अध्यक्षीय समारोपात सद्दाम शाह यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करून आभार मानले.

स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक मो. जाकीर, रफिक खान, मो. कलीम, वसीम खान, असलम अली, शेख मुजीब, शेख इरफान, अजहर देशमुख, रुकय्या बेगम व गजाला मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य वाव मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top