Mahabreaking

[breaking_news]

dogs attacked: वाडेगावात पिसाळलेल्या श्वानाचा थैमान; महिलांसह २४ ग्रामस्थांना घेतला चावा, गावात भीतीचे वातावरण

dogs attacked : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत ९ फेब्रुवारी रोजी पिसाळलेल्या श्वानाने गावात धुमाकूळ घालत महिलांसह एकूण २४ ग्रामस्थांना चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राहुल सोनोने

वाडेगाव  : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत ९ फेब्रुवारी रोजी पिसाळलेल्या श्वानाने गावात धुमाकूळ घालत महिलांसह एकूण २४ ग्रामस्थांना चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्थानिक वाडेगावमध्ये पिसाळलेल्या श्वानाने महिला, पुरुष व मुलींना चावा घेत जखमी केले. त्यामुळे काही भागातील महिलावर्ग घराबाहेर जाण्यासही धजावत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संपूर्ण गाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जखमींपैकी ५ ते ६ जणांनी डॉ. शिवा करंजकर यांच्या खासगी दवाखान्यात उपचार घेतले, तर उर्वरित रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत करवते यांनी दिली.

जखमींमध्ये वंदना सरप (३५), बबिता महाले (४०), चंदा धनोकार (५०), पर्वता नेमाडे (७०), सुनीता आठे (३५), हर्षा फाळके (४६), कमला इंगळे (७२), नवल सरप (१६), ज्ञानेश्वर मसने (४२), प्रिया डोंगरे (३०), शेषराव अवचार (७०), मुलचंद काकडे (६१), अरुण चिंचोलकर (४५), अरविंद अग्रथे (२८), सुरेश भटकर (६५), हरिश्चंद्र शिरसाट (६५), दानिश काजी बेग (२१), कुणाल खंडारे (२२), ज्ञानेश्वर लहाने (२२), भक्ती वाडकर (१६), शेख सईद (३६), तुषार भटकर (२४), बेबीबाई राजघडे (५५), गजानन लोखंडे (४८), प्रकाश वासुदेव ठोंबरे (६५), सुमती भुस्कुटे आदींचा समावेश आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून पिसाळलेल्या श्वानाचा बंदोबस्त करावा, जेणेकरून ग्रामस्थांची भीती दूर होईल, अशी मागणी अनिल बारबुदे, दानिश काजी, सचिन धनोकर, सुनील घाटोळ, सुनील मानकर, संदीप ठोंबरे आदींनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top