Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Sanjay Raymulkar :संजय रायमुलकर यांच्या दातृत्वामुळे गजानन महाराज मंदिराच्या वैभवात वाढ – श्यामबाबु उमाळकर

Sanjay Raymulkar : तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या एक कोटी रुपये निधीतून गजानन महाराज मंदिर परिसराची संरक्षण भिंत आणि भव्य सभागृहाचे बांधकाम करता आले.त्यांच्या दातृत्वामुळे वैभवात भर पडली ,असे विचार सेवा समितीचे अध्यक्ष शामबाबू उमाळकर यांनी व्यक्त केले. श्रींच्या प्रगट दिन उत्सवात ते बोलत होते.उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.महाप्रसाद वितरण रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Sanjay Raymulkar

मेहकरात प्रगटदिन उत्सवात भाविकांची मोठी गर्दी: शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

मेहकर : तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या एक कोटी रुपये निधीतून गजानन महाराज मंदिर परिसराची संरक्षण भिंत आणि भव्य सभागृहाचे बांधकाम करता आले.त्यांच्या दातृत्वामुळे वैभवात भर पडली ,असे विचार सेवा समितीचे अध्यक्ष शामबाबू उमाळकर यांनी व्यक्त केले. श्रींच्या प्रगट दिन उत्सवात ते बोलत होते.उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.महाप्रसाद वितरण रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त ह. भ. प. देवदत्त पितळे व गोपाल पितळे यांचे प्रवचन डोणगाव मार्गावरील गजानन महाराज मंदिरात पार पडले. भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. माजी आमदार संजय रायमुलकर, लोणार येथील नगराध्यक्ष मीराताई भूषण मापारी, नगरसेवक संजय ढाकरके, बाळू सिंगनाथ, निलेश मानवतकर त्याचप्रमाणे शैलेश सावजी ,आशिष रहाटे, भास्करराव गारोळे ,प्रदीप देशमुख, वामनराव झोरे, अनंतराव वानखेडे, भैय्यासाहेब देशमुख ,केशवराव फुके विष्णुपंत पाखरे ,प्रदीप देशमुख, कलीम खान ,विलासराव काळे, वसंतराव देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
गेल्या पंधरा वर्षापासून प्रगट दिन उत्सव साजरा केला जातो. शहर आणि आजूबाजूच्या परिसरातून भाविक मोठ्या संख्येने इथे येतात, ही आनंदाची बाब असल्याचे शामबाबू उमाळकर म्हणाले. मेहकर, लोणार तालुक्यातील ६० गावांमधील गजानन महाराज मंदिराच्या ठिकाणी सभागृह उपलब्ध करून देता आले हे माझे भाग्य आहे, असे सांगून संजय रायमुलकर म्हणाले की, जाती पातीचा विचार न करता दोन्ही तालुक्यात ६०० पेक्षा अधिक सभामंडपांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.
गजानन महाराज सेवा समितीचे सुदेश लोढे, वैभव उमाळकर, सुरेश मुंदडा, घनश्याम जोशी, गोपाल पाखरे, चंद्रशेखर जोशी आदि यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. महाप्रसाद वितरण संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश बावस्कर यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top