Mahabreaking

[breaking_news]

 Andhale Guruji family :धाबा येथील आंधळे गुरुजींची दुसरी पिढी ‘श्रीं’च्या सेवेत; प्रकटदिनी मंदिरात भक्तांची गर्दी

Andhale Guruji family : श्री संत गजानन महाराजांच्या चरणी आयुष्य अर्पण करणारे धाबा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामराव वामनराव आंधळे गुरुजी यांच्या सेवाभावी परंपरेचा वारसा आता त्यांच्या दुसऱ्या पिढीने समर्थपणे पुढे नेला आहे. प्रकटदिनानिमित्त येथे दरवर्षी भक्तांची मोठी गर्दी उसळत असून मंदिर परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघतो.

 Andhale Guruji family

बबन इंगळे 

बार्शीटाकळी  : श्री संत गजानन महाराजांच्या चरणी आयुष्य अर्पण करणारे धाबा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामराव वामनराव आंधळे गुरुजी यांच्या सेवाभावी परंपरेचा वारसा आता त्यांच्या दुसऱ्या पिढीने समर्थपणे पुढे नेला आहे. प्रकटदिनानिमित्त येथे दरवर्षी भक्तांची मोठी गर्दी उसळत असून मंदिर परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघतो.

सन २००३ मध्ये धाबा येथे श्री संत गजानन महाराज मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिर परिसरात विविध देवी-देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा दिवंगत नेते, योजनामहर्षी तथा माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्या हस्ते झाली. तेव्हापासून येथे विविध धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.वाशिम जिल्ह्यासह विविध भागांतून शेगावकडे पायदळ वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंदिरात चहा-पाणी, फराळ व भोजनाची व्यवस्था भाविकांच्या सहकार्याने केली जाते. प्रकटदिनाच्या दिवशी हजारो भक्तांच्या उपस्थितीत भजन-कीर्तन, धार्मिक कार्यक्रम आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन होत असून पंचक्रोशीतील भाविकांचे विशेष आकर्षण ठरते. रामराव आंधळे गुरुजी यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी मंदिरसेवा अखंड सुरू ठेवण्याचा संकल्प कुटुंबीयांनी केला. गुरुजींची पत्नी तारामती आंधळे, सून सरलाताई आंधळे, नातू गोविंदा आंधळे आणि विधीज्ञ चेतन आंधळे हे श्रींच्या सेवेत सक्रिय असून मंदिरातील धार्मिक उपक्रमांचा वारसा यशस्वीपणे पुढे नेत आहेत.

एकूणच, आंधळे गुरुजींच्या सेवाभावाची परंपरा पुढील पिढीतही तेवढ्याच श्रद्धेने जोपासली जात असून धाबा येथील श्री संत गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी श्रद्धा व सेवाभावाचे केंद्र बनले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top