Mahabreaking

[breaking_news]

Sant Gajanan Maharaj :साखरखेर्ड्यात  संत गजानन महाराज प्रकटदिन सोहळा; ८ फेब्रुवारीला महाप्रसाद, तीन दिवस धार्मिक कार्यक्रम

Sant Gajanan Maharaj : येथील शिक्षक कॉलनीतील श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रींच्या प्रकटदिनानिमित्त तीन दिवसांच्या भावभक्तीपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवार, ८ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वितरणाने सोहळ्याची सांगता होणार आहे. यंदा हा प्रकटदिन सोहळा १९व्या वर्षात पदार्पण करत आहे.

Sant Gajanan Maharaj'

साखरखेर्डा : येथील शिक्षक कॉलनीतील श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रींच्या प्रकटदिनानिमित्त तीन दिवसांच्या भावभक्तीपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवार, ८ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वितरणाने सोहळ्याची सांगता होणार आहे. यंदा हा प्रकटदिन सोहळा १९व्या वर्षात पदार्पण करत आहे.

ह.भ.प. पंजाबराव बिलारी महाराज यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या सोहळ्यात दररोज सकाळी ५.३० ते ६.३० काकडा आरती, ६.३० ते ७.०० विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० श्री भक्ती विजय ग्रंथ सामूहिक पारायण, सायंकाळी ६.०० ते ७.०० हरिपाठ तसेच रात्री ९.०० ते ११.०० हरिकीर्तन व जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. ग्रंथ पारायण व्यासपीठाचे नेतृत्व ह.भ.प. सौ. रूख्मिणाताई मधुकर भगत करणार आहेत.

६ फेब्रुवारी रोजी रात्री ह.भ.प. दिगंबर आसाबे (वरदडा) यांचे हरिकीर्तन, तर ७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. वैभव महाराज मानतकर (हिवरा गडलिंग) यांचे कीर्तन होणार आहे. त्याच दिवशी दुपारी ह.भ.प. दिगंबर गाडे गुरुजी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.

रविवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ह.भ.प. साध्वी त्रिवेणीताई देशमुख यांचे काल्याचे कीर्तन होऊन त्यानंतर श्री गजानन महाराजांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत संत सावता महाराज, येल्होजी महाराज, नवनाथ, महाळूबाबा, धडंगी अवधूत व रोकडोबा महाराज भजनी मंडळांसह विविध भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे.

पालखी मिरवणुकीनंतर श्रींचे विधिवत पूजन व महाआरती होऊन महाप्रसाद वितरणाने सोहळ्याची सांगता होईल. पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज तसेच रोकडोबा महाराज मंदिराचे ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज चिंचोलकर यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. सायंकाळी युवा गायक संतोष बोंडफळे, लोमटे सर व आखरे सर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रमही होणार आहे.या भावभक्तीपूर्ण सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ह.भ.प. पंजाबराव बिलारी महाराज यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top